कुत्रा आड आला अन् दोन वाहनांचा अपघात झाला …!  कुत्रा मात्र गतपण झाला!

कंधार – फुलवळ या राष्ट्रीय
महामार्गावर कुत्रा आड आल्याने कुत्र्याला वाचवण्यासाठी वाहन चालकाने ब्रेक करतात पाठीमागून येणाऱ्या टिप्परने समोरील चार चाकी वाहनास ठोकल्याने अपघात होऊन, वाहनाचे मोठे नुकसान झाले, तर कुत्रा जागीच गत प्राण झाला आहे. सुदैवाने जीवित हानी मात्र टळली.

अपघाताची पुढील माहिती अशी की, आज दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोज शुक्रवारी सकाळी अंदाजे ५:०० ते ५:३० वाजताचे दरम्यान कंधार – फुलवळ रोडवरील सिद्धिविनायक मंगल कार्यालय समोर रोडवर कुत्रा आड आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाने गाडीला ब्रेक केल्याने सदरच्या गाडीस पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने ठोकल्यामुळे मोठा अपघात होऊन, एम. एच.२६ बीएक्स ७०८७ हे चार चाकी रोडच्या उजव्या बाजूला मंगल कार्यालयाच्या आवारात जाऊन पडले तर टिप्पर विरुद्ध दिशेला म्हणजेच रोडच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात रोडवर आलेला कुत्रा मात्र गत प्राण झाला आहे, तर दोन्ही वाहनातील व्यक्तींना किरकोळ दुखापत होऊन

मनुष्य हानी मात्र टळली आहे. मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला असून, ही कुत्र्याची कळपे रोडवर फिरत असल्यामुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे, अशा मोकाट कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी जनतेतून चर्चा होत असल्याचे ऐकावयास मिळत आहे.

घटनेचे वृत्त कळताच कंधारचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, दोन्ही वाहन चालक यांच्याशी दुखापती बाबत चर्चा करून पुढील चौकशीसाठी बीट जमादार यांना घटनास्थळ पंचनामा करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *