माझ्या मित्राने कृष्ण सुदाम्याची एक गोष्ट आता फॉरवर्ड केली.. जी सगळ्याना माहीत आहे.. अत्यंत गरीब सुदामा त्याचे मित्र साक्षात भगवंत श्रीकृष्ण यांची भेट घेउन परतला .. जाताना त्याने भगवंतासाठी मूठभर पोहे नेले होते आणि तो जेव्हा घरी परतला तेव्हा तेव्हा त्याच्या झोपडीचा महाल झाला होता.. जिथे भक्ती आहे तिथे सगळं काही आहे हा अनुभव मी अनेकदा घेतलाय .. या कृष्ण सुदामाच्या गोष्टीवरुन दोन दिवसांपूर्वी घडलेली खरी घटना मी तुम्हांला सांगते.. यात अतिशयोक्ती नाही आणि एकही शब्द खोटा नाही किवा मी कोणासाठी काय करते हे तर अजिबात मिरवायचं नाही.. हा पॅरा वाचुन विसरुन जा आणि खालचा पॅरा माझ्या प्रत्येक वाचकाने लक्षात ठेवावा..
मी लहानपणापासूनच कृष्ण भक्त आहे.. अनेकदा मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट माझ्या समोर काही वेळात हजर असते हेही अनुभवलय पण मुळातच मी अल्पसंतुष्ट आहे.. सगळं उपभोगुन झाल्यामुळे समाधानी आहेआणि हेच माझ्या सुखी जीवनाचं रहस्य असावं.. आमच्या सोसायटी गृपवर एक मेसेज आला होता . ” एक अंध मुलगा सोसायटीमधे कॅलेंडर विकतोय त्याच्याकडून सगळ्यानी विकत घ्या.. सचिन जाऊन त्याच्याकडुन कॅलेन्डर घेउन आला .. तो अंध मुलगा पिंपरीहुन कॅलेंडर विकायला वारजेत आला होता..मी सचिनला म्हटलं , अरे त्याला काय मिळत असेल रे.. मी पैसे घेउन परत सचिनला पाठवलं आणि आमच्याकडे एक अंधांची पांढरी काठी होती ती त्याला द्यायला दिली.. तुम्हा सगळ्याना माहीत आहेच मी ग्रॅजुएशन नंतर ब्लाइंड टिचर डिप्लोमा केलाय आणि भगवंताने मला अंधांची सेवा करायची संधी दिली आहे.. समाजातील प्रत्येक घटकांचा मी खुप आदर करते ..
मी काय दिलं हे तुम्हाला सांगतेय कारण त्यानंतर भगवंताने त्याबदल्यात दुसऱ्या दिवशी मला काय दिलं हे तुम्हाला सांगायचय कारण ते महत्वाचं आहे.. आपण कोणाहीसाठी काहीही केलं की ते विसरुन जायचं पण दुसऱ्याने आपल्यासाठी काय केलं हे लक्षात ठेवायचं हा माझा फंडा..
माझा मित्र दुसऱ्या दिवशी मला भेटला आणि म्हणाला , सोनल मी तुझ्यासाठी दरमहा ५००० सेव्ह करुन ठेवतोय हे मी तुला बोललो होतो आता त्यात मी अजुन ५००० वाढवणार आहे . मी लगेच त्याला नको म्हटलं , त्यावर तो म्हणाला , अगं तु कुठे मागितलेस मी देणार आहे. देवाकडे एकच मागणी आहे की माझ्या मित्राकडुन मला ते पैसे कधीही घ्यायला लागु नयेत अशी माझी आर्थिक परिस्थिती असावी कारण असेही मित्र आहेत जे श्रीकृष्णसारखे सदैव माझ्या सोबत असतात..
श्रीकृष्ण सगळीकडे जाऊ शकत नाही पण अशा देवमाणसाच्या रुपात तो कायम आपल्या सोबत असतो… मी इच्छा केलेली प्रत्येक गोष्ट हातात यायला फक्त माझी भक्ती कामी येते.. प्रत्येकवेळी कर्म कामी येतात..
माझ्या मित्राचे किती आभार मानावेत .. भगवंताने त्याला असाच पैशाने आणि मनाने समृद्ध करावं.. त्याला निरोगी आयुष्य लाभावं आणि आपण सगळ्याना सुदामा बनुन भगवंताची सेवा करायला मिळावी .. सुदामा श्रीकृष्ण यांचं नातं लक्षात ठेवुन मी कायम सगळ्याशी वागायचा प्रयत्न करते .. तेच खरं आयुष्य आहे कारण फेम हे सदैव सोबत नसेल पण भक्ती केली तर श्रीकृष्ण सदैव वेगवेगळ्या रुपात आपल्या सोबत रहातो.. हरीनाम घेत रहा ..
हरे कृष्ण.
सोनल गोडबोले