दहा रुपयांचे नाणे अधिकृतच न घेतल्यास होणार कायदेशीर कारवाई

 

नांदेड ; जिल्ह्यातील काही शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका 10 रुपयांचे नाणे व्यवहार करण्यासाठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा असून हे नाणे स्विकारण्यास नकार देणारे विक्रेते, संबंधीत व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणी प्रस्तृत करते. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालिन असल्याने, निरनिराळया डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यत 14 डिझाईन्समधील 10 रुपयांची नाणी दिली आहेत. त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनामार्फत कळविण्यात आले आहे. ही सर्व नाणी वैध चलनात आहेत.

सर्व शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, व्यापारी विक्रेते यांनी 10 रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर केला पाहिजे. याचबरोबर बँकानी आपल्या शाखेच्या बाहेर बँनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. बँकांनी ग्रामीण भागातील यंत्रणाचा पुरेपुर वापर करुन नागरिकांपर्यत हा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *