कंधार ; प्रतिनिधी
बहादरपुरा ता. कंधार येथे गावातील सर्व ओबीसी समाज, 7 जानेवारी रोजी नर्सी येथील ओबीसी आरक्षण महामेळावाच्या अनुषंगाने एकत्र येऊन, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी गावातील ओबीसी प्रवर्गातील वाणी, माळी, निराळी, कुंभार, पद्मशाली, नाभी, परिट, कोष्टी, रंगारी, मुस्लिम-छपरबंद, मुस्लिम-कासार, मुस्लिम- अतार, मुस्लिम-तांबोळी आदी जातींमधील ओबीसी समाज मैदानात उतरले असून ओबिसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला .
ओबीसी आरक्षणावरील अतिक्रमण थांबवा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरीत करा, ओबीसी समाजा विषयी द्वेष थांबवा, सर्व स्थरावरील लोक प्रतिनिधींनी ओबीसी आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करा; अश्या विविध मागण्यासाठी नर्सी येथिल मेळावा आयोजित केल्याचे प्रतिपादन यावेळी ओबीसी जिल्हा संयोजन समिती तर्फे करण्यात आले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण तर तूर्तास गेलेच पण आता शैक्षणीक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणही यामुळे धोक्यात येणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीचे प्रचंड नुकसान होणार, अशी चिंता यावेळी गावातील जेष्ठ मंडळींनी व्यक्त केली. या ओबीसी महामेळाव्यास बहाद्दरपुरा येथील ओबीसी समाज बांधव मोठया संख्येने जाणार, असा निर्धार यावेळी ओबीसी बाधवानी व्यक्त केला.
नर्सी येथील सभेचे नियोजन कसे असेल, याची माहिती मा. महेंद्र देमगुंडे यांनी दिली तर कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे समन्वयक ॲड. अविनाश भोसीकर यांनी केले. यावेळी तालुका समिती मार्फत पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, दत्ताभाऊ कारामुंगे, माजी सरपंच डूबुकवड एस एन, प्रा. आर डी शिंदे सर, माऊली गित्ते, युवा नेते सचिन पेठकर, माधव गुंजाळे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला तालुका ओबीसी महामेळावा समिती तर्फे माजी सैनिक बालाजी चुकुलवाड, वसंतराव नीलावाड, माधवराव गणलपवाड, जेलेवाड पी एम, गोटमवाड डी के, गणेश पतीतवाड, बालाजी कुंभारगावे तर गावामधून सरपंच प्रतिनिधी शंकर खरात, बालाजी पेठकर, दत्तात्रय पेठकर, ग्रामपंचायत सदस्य कल्पना पेठकर, संध्याताई पेठकर हे उपस्थीत होते.