नांदेड;
साहित्यानंद प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या साहित्य व संगीत क्षेत्रात रचनात्मक काम करणाऱ्या संस्थेचे नांदेड जिल्हाप्रतिनिधी म्हणून भोकर जि.नांदेड येथील प्रसिद्ध कवी,गझलकार प्राथमिक शिक्षक चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी,गझलकार,गायक,संगीतकार विजय वडवेराव यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांचा नुकताच “समतेच्या डोहाकाठी” हा पहिलावहिला मराठी गझलसंग्रह गझलनवाज पं. भीमराव पांचाळेंच्या हस्ते प्रकाशित झाला आहे.या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.