लोह ;विनोद महाबळे
कोरोना पाश्र्वभूमीवर बदलत्या शिक्षण पद्धतीच्या विचार करून विद्यार्थ्यांसह शाळेचा नावलौकिक वाढवा या साठी सातत्याने प्रयत्न करणारे शिक्षक हे समाजासाठी प्रेरणास्थान ठरत असतात.जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथील कार्यरत राज्य पुरस्कार प्राप्त विषय शिक्षिका श्रीमती छायाताई बैस चंदेल ह्या व्हाटसअप च्या माध्यमातून दररोज शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडीयो / इडीओ क्लीप , स्वाध्याय, रोजचा अभ्यास, वस्तूनिष्ट प्रश्न ईत्यादी विविध प्रकारच्या साधनांचा वापर करून अध्यापनाचे कार्य अविरतपणे सुरु केल्याने त्यांच्या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे.
कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक व्यवहारा बरोबरच संबंध शा्लेय शिक्षण पद्धतीवर सुध्दा विपरीत परिणाम झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन व अध्यापनातील रंजकता वाढ़ावी, मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी श्रीमती छायाताई बैस चंदेल यांनी जवळपास पन्नास पेक्षा अधिक व्हिडीयो संबंधित विषयावर आधारीत तयार केले आहेत.
मुलांची ऑनलाइन ऑफलाइन शंभर टक्के उपस्थिती निर्माण व्हावी, गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांनी वर्गानुसार व्हाटसअप ग्रुप तयार केले आहेत. व्हाटसअप द्वारे संपर्क साधता येणारे विद्यार्थी, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणारे, मोबाइल नसणारे, टीव्ही, रेडियो उपलब्ध असणारे विद्यार्थी यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यानुसार लॉकडाउनच्या कालावधीचा सदुपयोग केला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.
सध्या कोरोनाच्या काळात मुलांना प्रत्यक्ष शिक्षण देणे अशक्य झाले आहे. यासाठी दररोज सकाळी व्हाटसअप ग्रुप वर साध्या टेक्स्ट मेसेज द्वारे अभ्यास पाठवून तो अभ्यास व्हाटसअप वरच तपासला जातो यात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही सहकार्य लाभले आहे. यासोबत शाळा निसर्गरम्य ठेवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजुळा जाधव व राजीव तिडके हे सुद्धा प्रयत्नशील असुन शाळेत वृक्षारोपण, परसबाग तयार करुन परिसर सुशोभित केला आहे.तसेच रोपे जगविण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.