ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गल्लोगल्ली


नांदेड –

शाळा बंद परंतु शिक्षण चालू या सूत्रानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष सर्वत्र सुरू आहे. नलाईन पद्धतीने शिक्षण चालू ठेवून व्हाटसप, युट्युब, दीक्षा अॅप तसेच टिलीमिली या दूरचित्रवाणीवरील पहिली ते  आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या शिक्षणविषयक मालिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू

असून यापैकी कोणताही लाभ मिळत नसलेल्या तसेच शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या फलाईन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गल्लोगल्ली जाऊन स्वयंअध्ययनावर आधारित स्वाध्यायपुस्तिका, गृहपाठ, आजचा अभ्यास, विकास व्यवसायमाला यांवर आधारित इयत्तानिहाय अभ्यास सुरु ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना प्रवृत्त करीत आहेत.

अध्ययन अडथळ्यांच्या नोंदी करुन त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची सोय स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जवळा येथील मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे आॅफलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. 


         

नलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. अनेक जणांकडे अँड्रॉइड मोबाइल नसतो. असलाच तर त्यात नेटचे बॅलन्स नसते. ते असले तरी वीजेच्या लंपडावामुळे त्यात चार्जिंग नसते.  एक किंवा दोन घरात एकच मोबाईल असतो. त्यातही हा मोबाईलधारक बाहेर असला म्हणजे आनंदीआनंदच असतो.

यावर जवळा देशमुख येथील शिक्षक ढवळे जी.एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांनी युक्ती शोधून काढत स्वखर्चाने स्वाध्यायपुस्तिकांची निर्मिती केली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक दिनदर्शिकेच्या अध्यापन पद्धतीनुसार येणाऱ्या अडचणींबाबत मोबाईल फोन वरुन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवित आहेत.

यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष बाबुमियाँ शेख, मिलिंद गोडबोले, कुंता शिखरे, मायादेवी गच्चे, मारोती चक्रधर, सखुबाई चक्रधर, आशाताई झिंझाडे, मिनाबाई गोडबोले, भिमराव गोडबोले, चांदू गोडबोले, सुनील पंडित, सुलोचना गच्चे आदींचे सहकार्य लाभत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *