प्रा.डॉ.बळीराम गायकवाड यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदी निवड नांदेड : प्रतिनिधी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ”लसाकम”चे राज्य सहसचिव,MGD परिवारातील सदस्य, नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य, मुंबई विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे (डी.एल.एल.ई.) संचालक प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला. प्राचार्य डॉ.बळीराम गायकवाड हे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक असून त्यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला असून त्यांची इंग्रजी विषयाची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. डॉक्टर बळीराम गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांची जगप्रसिद्ध “फकिरा” ही कादंबरी इंग्रजीमध्ये भाषांतरित केली असून ती भाषांतरित “फकिरा” ही कादंबरी जागतिक पेग्विंन प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे . डॉ .बळीराम गायकवाड सरांनी या अगोदर कोरोना काळात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून ते मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंदाचे संचालक म्हणूनही २०२० पासून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील मुंबई येथील रशियन दुतावासात संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वी करण्यात त्यांचे योगदान असून रशिया येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक समित्यांवर काम करत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांनी, विचारवंतांनी साहित्यिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.