कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यात ठिकठिकाणी वेळ अमावस्या निमित्य शेतकर्यांनी केले मातीचे पुजन आज दि.11 जानेवारी रोजी दुपारी दिड दोन च्या सुमारास करण्यात आले कंधार येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय गुतेदार वैजनाथराव सादलापुरे यांच्या शेतात यावेळी उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी परीवातील सदस्यानी या सणाबाबती माहीती दिली.
शेताच्या काळ्या आईच्या पूजेच्या मानाचा हा सण ही धरणी माय आपल्याला धन धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.प्रत्येक शेतात घरातील लोक ,पै पाहुणे, मित्रमंडळी यांच्या मुळे सगळे शिवार माणसाने फुलून जातात.
थंडीच्या दिवसात हा सण येतो म्हणून वेळाअमावास्येचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं.
या काळात रान विविध भाज्यांनी फुललेलं असतं. त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भजी भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील, या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात.या दिवशी सर्वात जास्त सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आंबील..हा पदार्थ सर्वात जास्त पिला जातो.
मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या या सणाला मराठवाड्यात फार महत्त्व आहे.. शेतकरी संस्कृती जपणारा हा उत्सव असून काळ्या आईची, माती पासून बनवलेल्या पांडवांची पूजा या दिवशी केली जाते..
कंधार येथील आपल्या शेतात सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय गुतेदार . वैजनाथराव सादलापुरे यांच्या कंधार येथिल शेताती वेळ अमावस्या साजरी केली…. भरपूर आनंद घेत सर्वांनी जेवनाचा आनंद घेतला…हा उत्सव बळीराजाला अधिक समृद्धी देणारा ठरावा