कंधार
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कंधार येथील रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आधुनिक (विना माती) पाण्यावरील सेंद्रिय शेती या प्रयोगाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला या प्रयोगात सहभागी विद्यार्थीनी अक्षरा कमलेश टेंभुर्णेवार, लक्ष्मीबाई दाऊ मेकलवाड यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी रविंद्रनाथ टागोर शाळेत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव यन्नावार होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख माधव कांबळे, माजी उपनगराध्यक्ष हमीद मौली, सामाजिक कार्यकर्ते शिवा मामडे, माजी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे,पंचायत समिती चे शिवाजी कनोजवार, दिलीप पवार, मुख्याध्यापक राजहंस शहापुरे, भास्कर कळकेकर, बसवेश्वर मंगनाळे,महंमद अनसारोद्दीन, मंजुर अहेमद मगदुमीया, प्रदीप कदम, दिगंबर वाघमारे,हरिहर चिवडे, सिंधुताई रापतवार, संस्थेचे सचिव गंगाप्रसाद यन्नावार, पत्रकार प्रल्हाद आगबोटे, रवि कांबळे, राजेश्वर कांबळे, माधव भालेराव, एस के गायकवाड,महंमद सिकंदर, अविनाश कदम, सिद्धार्थ वाघमारे,कमलेश टेंभुर्णेवार, दाऊ मेकलवाड, मुख्याध्यापक एस जी मुंडे, सहशिक्षक श्रीमती शेख वाय आय, श्री सुर्यवंशी आर एच , श्रीमती एम जी यन्नावार, श्री हनुमंते व्हि डी, श्री तिडके ई पी, श्री होंडाळे आर आर यांच्यासह पालक व नागरीक उपस्थित होते
यावेळी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, उपस्थित मान्यवरांनी रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या,माजी उपनगराध्यक्ष हमीद मौली, केंद्रप्रमुख माधव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवा मामडे यांची भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले, आभारप्रदर्शन मुख्याध्यापक एस जी मुंडे यांनी केले.