फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित इन्सपायर अबॅकस अकॅडमी ने शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन कंधार येथील संत नामदेव महाराज मठसंस्थानच्या लोहा रोडवरील मंगलकार्यालय आयोजित करण्यात आले होते , या स्पर्धेत नांदेड सह परभणी , अमरावती , यवतमाळ , मिर्जापुर , हिंगोली , छत्रपती संभाजी नगर , लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश होता. त्यात जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात टॉप टेन ठरलेल्या मध्ये कंधार येथील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कार मिळवल्याने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित इन्सपायर अबॅकस अकॅडमी कंधार येथे सौ. अश्विनी शिवसांब देशमुख मॅडम चालवत असतात आणि याच आयोजित नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन मध्ये कंधार येथील सौ. अश्विनी देशमुख मॅडम च्या टॉप टेन पैकी नऊ विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कार मिळवला असल्याने सर्वत्र सौ.अश्विनी देशमुख मॅडम सह त्या नऊ विद्यार्थ्यांचेही कौतुक होत असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
त्या नऊ चॅम्पियन विद्यार्थ्यांत गौरी शिवाजी बोरगावे , हर्षदीप धम्मानंद जाधव , श्रीधर भुरे , प्रांजल मानसपुरे , मारोती चमकुरे , विवेक नाईकवाडे , समीक्षा कांबळे , विवेक वरपडे , दिव्यतवी कळणे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सदर एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रदीप भद्रे , दादासाहेब शेळके , सौ. सत्यशीला भद्रे , सौ. अर्चना शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. राजश्री भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली याच संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी शंतनू कैलासे , शिवकुमार भोसीकर , वर्षाताई भोसीकर , चित्ररेखा गोरे , विश्वांभर मंगनाळे , वैजनाथ सादलापुरे , मनीषा धोंडगे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.