मुखेड- व्यक्तिमत्व विकासामध्ये माणुसकीच्या मूल्यांची जाणीव घेऊन कार्य करणे, आई-वडिलांना देवरूप म्हणून त्यांची सेवा करणे,गुरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणे होय.अलीकडच्या काळामध्ये माणसं जशी जशी जास्त शिकत जातात तशी तशी आपला गाव, देश सोडून विदेशात स्थाईक होतात.हे चुकीचे आहे. आई-वडिलांना विसरू नका. देशासाठी काही करायची धडपड तरुणांमध्ये असली पाहिजे. जो मनाने तरुण तो खरा तरुण. दादा धर्माधिकाऱ्यांनी तरुणाची व्याख्या सांगताना तेजस्विता, तपस्विता, तत्परता ज्यांच्या ठिकाणी असते त्यांनाच तरुण म्हणावे असे सांगितले.
समाजसेवा,अभ्यास आई-वडिलांची सेवा याला महत्व तरुणांनी द्यावे.असाध्य ते साध्य करीता सायासl कारण अभ्यास तुका म्हणे llअसे संत तुकारामांनी सांगितले. उठो,जागो, लक्ष्य पर पहुंचने तक रूको मत, अभ्यासाचे बळ घेऊन जगा, हमे मोबाईल से क्या मतलब असे म्हणुन मदरसा आणि पुस्तकांच्या वरती प्रेम केलं पाहिजे.हा सर्व विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय.सेवाभाव असावा, व्यसनमुक्त व्हा,व्यसनच करायचे असेल तर अभ्यासाचे करा. देशप्रेमी, देशप्रेमी तर काही वेश्या प्रेमी असतात.तर आपण देश प्रेमी बनलं पाहिजे.विषारी नाही तर विचारी बना.ती लहान वयात गाडी चालवू नका.रस्ता सुरक्षा, आई वडील व समाज व राष्ट्रावर प्रेम करा.जनसेवा हीच ईश्वर सेवा समजा.अंतर्बाह्य रूपाची गोळा बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय असे प्रतिपादन कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हाडोळती ता.अहमदपूर येथील प्रा.डॉ.सादिक शेख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव (पी.)ता.मुखेड येथे बहि:शाल व्याख्यानमालेच्या द्वितीय व्याख्यान पुष्प प्रसंगी व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना केले.
यावेळी माजी प्राचार्य डाॅ.रामकृष्ण बदने यांचे ही भाषण झाले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की मुख्याध्यापक गोविंद चव्हाण यांनी जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. अनेक भौतिक सुविधा व उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या.भौतिक सुख सुविधा ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा फायदा घ्या.विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमातून कार्यक्रमाचे नियोजन कसं करावे व कार्यक्रमाची रुपरेषा कशी असते हे आपल्या लक्षात येते. भारतीय संस्कृती ही त्यागाची संस्कृती असून भगतसिंगाच्या उदाहरणाद्वारे त्यांनी त्याग किती महत्त्वाचा आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहि:शाल व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा.डॉ.मदन गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, पाहुण्यांचा परिचय व आभार माजी प्राचार्य डाॅ.देविदास केंद्रे यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव (पी.)ता.मुखेड येथील मुख्या. गोविंद चव्हाण, प्रा.संगमेश्वर केंद्रे, सर्व शिक्षक, पालक,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.