आयोध्या येथील राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंघाने सोन्या मारुती मंदिर, शिवशक्ती नगर नांदेड येथे होणाऱ्या सप्ताहाची सुरुवात स्वच्छता अभियानाने

नांदेड : प्रतिनिधी

आयोध्या येथील राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंघाने सोन्या मारुती मंदिर, शिवशक्ती नगर नांदेड येथे होणाऱ्या सप्ताहाची सुरुवात स्वच्छता अभियानाने झाली असून पहिल्याच दिवशी रामेश्वर येथील राम शीला पूजन, भजन, सामूहिक हनुमान चालीसा व महाआरती करण्यात आली असून २२ जानेवारीपर्यंत दररोज वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आली असल्याची माहिती धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, शशिकांत भुसेवाड यांनी दिली आहे.

भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत १६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ९ पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात राम भक्तांनी चांगला प्रतिसाद देत मंदिराची व परिसराची स्वच्छता केली. यामध्ये दिलीप ठाकूर, नरसिंगराव कहाळेकर, धीरज यादव, अभिजीत पाटील आडंगेकर,कपिल यादव, अशोक साखरे,नथूलाल यादव,गोविंद पाळवेकर,नंदलाल यादव
नारायण पाळवेकर,शक्ती साखरे, नर्सिंग द्रौपदीवार,रोहन यादव ,कालिंदी कहाळेकर,अनिता यादव ,रेखा नगारे, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.सकाळी दहा ते एक दरम्यान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीया यांनी रामेश्वर येथून आणलेल्या राम शिलाचे पूजन करण्यात आले.

 

पाण्यात न बुडणारी शिला पाहून सर्वजण चकित झाले. याप्रसंगी दिलीपसिंह सोडी, भरत यादव, अंबादास जोशी यांची विशेष उपस्थिती होती. संध्याकाळी महिलांनी भजने म्हटली. त्यामध्ये विमल भारती,हिरुताई भंडारे, विमल रूमने,निर्मला यादव, पल्लवी,लक्ष्मीबाई गुटाळ, ममता यादव, संगीता यादव, निर्मला भोसले, सुनिता यादव, मीनाक्षी नगनुरवार,हेमलता यादव, लक्ष्मीबाई द्रोपदीवार,फुलाबाई भोसले,पार्वती यादव, कांचन यादव,शितल यादव,

प्राची टापरे,मनीषा यादव, मयुरी यादव,आराध्या यादव,
अनोखी यादव,साक्षी टापरे,कविता यादव यांचा समावेश होता. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मंदिराला चार ग्रीन मॅट,संतोष भारती यांच्यातर्फे माईक देण्यात आले. राजेश यादव यांच्यातर्फे मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली. शशिकांत भुसेवाड यांच्यातर्फे चहा पानाची व्यवस्था करण्यात आली.२१ जानेवारीपर्यंत सोन्या मारुती मंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता सामूहिक हनुमान चालीसा, भजनसंध्या व महाआरती ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्रत्येक घरासमोर रांगोळी , तसेच किमान ११ दिवे, आणि घरावर भगवे झेंडे तथा विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

 

 

या भागातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली असून ११ महिलांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. दुपारी अकरा ते एक दरम्यान अयोध्या येथे नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी एक ते दोन दरम्यान महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता शशिकांत भुसेवाड मित्र मंडळातर्फे नामांकित वाद्यवृंदांची भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला रामभक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *