क्षीण दृष्टीच्या रुग्णांना सुदृढ दृष्टी प्रदान करण्यासाठी कटीबध्द केशवसुत-प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे

कंधार : 
शिव बसव लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या समाजाभिमुख परिवर्तनवादी विचारांना अभिवादन व मानाची कोटी-कोटी जयक्रांति करून…. प्रा. डॉ.आदरणीय पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब यांनी जन सेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्याचा वसा जोमाना चालवत आहात!ही गोष्ट खूप अभिमानाची व सन्मानाची आहे.मा.पुरषोत्तम भाऊसाहेब तुम्ही कोणतीही कार्य करत असताना खूप तळमळीने व मनापासून करत असता. तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य अजोड आहे त्याला तोडच नाही! तुमची इच्छा शक्ती खूप विशाल आहे.

तुम्ही तर खरच गोरगरीब जनता-जनार्धनाचे मायबाप अन् देवमाणूस आहात. दीन-दुबळ्या,सुग्या-मुग्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. प्रा.डॉ.आदरणीय पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब आपण समाजसेवेचे जे कार्य हाती घेतलेले आहे. कोरोना काळात “भाऊचा डब्बा” या उपक्रमांतर्गत हजारो रुग्णांना व त्यांच्या नातलगांना आपण जेवण पोहोचवणे हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून करता. तसेच गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षीस रुपी कौतुकाची थाप पाठीवर ठेवत आधार देता.

तसेच मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला अशा मराठा योद्धाना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे असो आपण नेहमी आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत असता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *