कंधार प्रतिनिधी
श्री क्षेत्र कंधार भगवानगड कंधार तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे दिनांक १९ ते २६ जानेवारी २०२४पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञान
यज्ञ या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठान कंधार व श्री संत भगवान बाबा सप्ताह कमिटीच्या वतीने भगवानगड कंधार येथून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाता भजन दुपारी एक ते चार भागवत कथा ह.भ.प. देविदास गिते महाराज चोंडीकर हे सांगणार आहेत.सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरिकीर्तन होईल श्री ह. भ .प. देविदास महाराज गीते चोंडीकर यांचे शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. महादेव महाराज देवकते घागरदरेकर शनिवार २० जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. पंढरीनाथ महाराज मुरकुटे नांदेड रविवार २१जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. रामकिशन महाराज पवार सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. माधव महाराज मुंडे पाताळगंगा मंगळवार २३ जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. नारायण शास्त्री महाराज पळसवाडीकर बुधवारी २४ जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. ज्ञानोबा माऊली शिंदगीकर गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी, श्री ह. भ. प. वासुदेव शास्त्री मुंडे गोपीनाथ गड परळी शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी यांचे सकाळी अकरा ते एक वाजता काल्याचे किर्तन होईल.
नंतर श्री नारायण कोंडीबा मुंडे व मुंडे कोचिंग क्लासेस नांदेड व श्री पांडुरंग संभाजी चाटे कंधार यांच्या तर्फे काल्याचा महाप्रसाद होईल.तरी पंचक्रोशीतील व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे भगवान बाबा गड यांच्या कमिटीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.