कंधार : (दिगांबर वाघमारे )
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानिमित्त कंधार शहरातील श्रीराम मंदिरासह विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेले अयोध्या येथील श्रीराम मंदिर व श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त २२ जानेवारी रोजी देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे , त्याच अनुषंगाने कंधार शहरांमध्ये व तालुक्यात लोकोत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त दि २१ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नगरेश्वर मंदिर कंधार सकाळी दहा वाजता एकवीस हजार लाडूचा महाप्रसाद तयार करण्यात येणार आहे त्या भोग प्रसाद वेळी श्रीराम मूर्ती महापूजा अभिषेक व आरती करून महाप्रसादाचा भोग चढवण्यात येणार आहे, दि २२ जानेवारी रोजी सकाळी सहा ते बारा पर्यंत श्रीराम मंदिर कंधार येथे विधिवत पूजा, अभिषेक, ध्वज पूजन ,शृंगार आरती व महाआरती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता महापूजा व महाप्रसादाचा भोग चढवण्यात येणार आहे यावेळी उपस्थित भक्तांना श्री राम मंदिर अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी मोठ्या स्क्रीन छ.शिवाजी महाराज चौक व श्री राम मंदिर येथे लावण्यात येणार आहेत.
२१००० लाडूंचे वाटप शहरातील प्रत्येक नगरा मध्ये व सर्व मंदिरांमध्ये राम भक्तांच्या वतीने करण्यात येणार आहे, सायंकाळी सहा वाजता उत्तर प्रदेशातील प्रख्यात भजनकार मनोज तिवारी यांचा भजनाचा कार्यक्रम भजन संध्या सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर या ठिकाणी होणार आहे, तसेच शहरातील सर्व मंदिरांवर रोषणाई करून प्रत्येक मंदिरासमोर आतिषबाजी करण्यात येणार आहे या विविध कार्यक्रमास सर्व राम भक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान लोकोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.