आज आधुनिक विज्ञानाच्या काळात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था, प्रतिष्ठान, बचतगट हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करून महिलामध्ये जनजागृती, आत्मभान, आत्मबल, आत्मनिर्भर, आत्मविश्वास आणण्यासाठी व आपल्या संस्कृतीने दुसऱ्यांना देण्याचे शिकविले आहे, ते विसरू नये म्हणून हे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,
दरवर्षी मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो . तो मकरसंक्रांत पासून रथसप्तमी पर्यंत चालतो, भौगोलिक कारणा नुसार या दिवशी दक्षिणायण संपते, व उत्तरायण सुरू होते, तसेच दिवस तीळातीळाने मोठा होत जातो. यालाच नैसर्गिक संक्रमणाचा काळ असेही म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी महिलांना हिडण्या -फिरण्याचे स्वातंत्र्य नव्हते ,अनेक समाजामध्ये महिलावर बंधने व पडदा पद्धती होती तसेच वर्णव्यवस्था असल्यामुळे कोणाच्या ही घरी कोणाला जाता येत नव्हते. पण काही महिलांच्या कल्पकतेतून हा विचार पुढे आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण शिकवले व पुण्यात मुलींची पहिली शाळा 1848 ला सुरू करण्यात आली. नंतर हळूहळू मुली प्रगत होत गेल्या. एक -एक मुलगी शिक्षणासाठी, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागली. त्यातून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात सुरू झाला या हळदी कुंकाच्या कार्यक्रमा तून महिलांना एकत्रित येण्याची सुवर्ण संधी मिळाली ,गप्पागोष्टी करता येऊ लागल्या ,एकमेकीचे दुःखे सांगून घेता येऊ लागली, त्यातून तिळागुळासोबत वाण देण्याची प्रथा सुरू झाली, प्रत्येक महिला सुवासिनी महिलांना घरी बोलावून संसारोपयोगी वस्तू देऊ लागल्या .
अशा प्रकारे हळूहळू हा उपक्रम संपूर्ण देशात साजरा होऊ लागला. 21 व्या शतकातील महिला या उपक्रमशील आहेत त्यांना अनेक गोष्टीचे आत्मभान आलेले आहे, त्या आर्थिक बाजूने सक्षम झाल्या आहेत, त्यामुळे या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांचे परिवर्तनवादी विचार पुढे येत आहेत.अनेक महिला एकत्रित बसून विचार विनिमय करीत आहेत. मनात साठवून ठेवलेल्या कल्पना त्या उपक्रमातून सर्वा समोर मांडत आहेत त्यामुळे हा उपक्रम घरोघरी अतिशय लोकप्रिय झालेला आहे ,यातून चर्चा होऊन पुढील दिशा ठरविले जात आहे, हळदीकुंकू हे मांगल्याचे प्रतीक आहे प्रत्येक सुवासिनी या कार्यक्रमात येते वेळेस मनाला आवडणारे दागिने,ड्रेस, साड्या घालून येतात. त्यामुळे त्यांनाही आनंद होत असतो. परिवर्तनवादी गोष्टी येथे शिकायला मिळतात.
एकमेकांचे पाहून शिकता येते ,सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती महिला कोणत्या जातीची,धर्माची, पंथाची आहे ,याकडे कोणी लक्ष देत नाही
,एकमेकांच्या मैत्रिणी म्हणून हा उपक्रम अतिशय थाटामाटाने ,आनंदाने, उत्हासाने साजरा केला जातो .या उपक्रमामुळे जातीभेदाच्या शृंखला गळून पडत आहेत .भेदभाव नाहीसा झालेला आहे. सरळ सरळ थेट एकमेकींच्या घरात, वाड्यात,बंगल्यात प्रवेश करता येतो .आणि आनंद द्विगुणित होतो या उपक्रमातून चांगले वाण म्हणून ग्रंथ ,वृक्ष, महत्त्वाचे साहित्य दिले जात आहेत, म्हणून या उपक्रमातून अनेक चांगल्या बाबी आपल्यासमोर येत आहेत. आजची स्त्री नाविन्यपूर्ण आहे. ती नवनवीन गोष्टी शिकण्यास तयार आहे. चूल आणि मूल ही संकल्पना बरोबर घेऊन महिला गरूड भरारी मारत आहेत. कर्तृत्ववान महिला सुनिता विलियम्स, कल्पना चावला
,सानिया मिर्झा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ,श्रीमती इंदिरा गांधी, किरण बेदी, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे यासारख्या महिला पुढे आलेल्या आहेत. हळदी कुंकूवाच्या उपक्रमातून महिलांना बोलण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ,त्यामुळे त्यांच्या मनातील कल्पना त्या व्यक्त करतात. त्यावेळेस सर्व महिला एकत्रित येतात. त्यामुळे जातीभेद व भेदाभेद नाहीसा होतो . त्यामुळे महिला नवनवीन उपक्रम शिकण्यास तयार होतात. पाठीमागे न राहता आपण सुद्धा सक्षम आहोत याची जाणीव करून देत आहेत म्हणून आज ऑलम्पिक, क्रिकेट, हॉलीबॉल ,हॉकी , खो खो, कबड्डी या सर्व स्पर्धेत मुली –
मुलांबरोबर भाग घेत आहेत ,बौद्धिक नॉलेज वाढल्यामुळे आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले आहे ,या उपक्रमातून वैचारिक विचारांची देवाण-घेवाण होत आहे,त्यातून नेतृत्व करण्याची संधी महिलांना मिळते म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33 % टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत , महिला शिक्षण घेतल्यामुळे उपयोग झाला, सर्व गोष्टीचे मूळ एकत्रित झालेल्या सण- समारंभ
महिला मेळावा,महिला दिन, वार्षिक स्नेह संमेलन,हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातूनच झाले आहे, असे मला वाटते, महिला या मैत्रिणी जवळ सत्य का आहे ते सांगतात, त्यामधून वैचारिक विचारांची देवाण-घेवाण होते, तिळगुळ घ्या गोड गोड बोला न म्हणता खरे बोला असं सुद्धा अलीकडील काळात म्हटले जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांना सुख देणारा आहे. दबलेल्या आवाजाला वाट मोकळी करून देत आहे. अनेक चाणाक्ष महिला बुरसटलेल्या विचारा पासून दूर जात आहेत, त्यामुळे आधुनिकीची कास धरून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जात आहे, या कार्यक्रमातून महिलांचे उद्बोधन व्हावे , समाजात एकात्मता नांदावी, जात ,धर्म विसरून सगळे एका विचाराने चालावे तसेच अंधश्रद्धा रुढी,परंपरा बाजूला ठेवून एकत्रित यावेत, व गरुड झेप घ्यावी हीच अपेक्षा. ..
शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड