ग्रामीण महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

 

मुखेड- ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी.नांदेड येथे दि.23 जानेवारी 2024 रोजी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आखल्या जाणाऱ्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित वाणिज्य विभागाकडून एक दिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधर राठोड असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड -कंधार विभागाचे आमदार डाॅ.तुषार राठोड उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रस्तुत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रोफे.सौ. एम.एस.देशपांडे, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्रोफे. डी.एम. खंदारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड उपस्थित राहणार आहेत.

 

सदरील उद्घाटन समारंभ सकाळी 10.30 वाजता कै.आ.गोविंदराव राठोड सभागृहात संपन्न होणार असून नंतर तीन सत्र संपन्न होणार आहेत. नंतर मान्यवरांचे उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
या एक दिवशीय कार्यशाळेसाठी प्रस्तुत विद्यापीठातील वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.बळीराम राठोड,प्रा.प्रदीप कोटुरवार, प्रा.डॉ.नागोराव आडे व संयोजन समितीने एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *