कंधार : प्रतिनिधी
कुरुळा ता कंधार जि नांदेड हे गाव मुख्य बाजारपेठ, जि.प. सर्कल अंतर्गत हे ठिकाण सर्व खेडे व वाडीतांडयासाठी सर्वात जवळ असून हे मध्यवर्ती ठिकाण आहे. कुरुळा सर्कलच्या आजूबाजूला किमान १५ ते २० कि मी अंतरावर मोठे रुग्णालय नाही ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी सध्या मौ कुरुळा या ठिकाणी प्रा आ केंद्र कार्यरत आहे.गावाची लोकसंख्या पाहता ग्रामीण रुग्नालायाची आवश्यकता असल्याने शासनाने तात्काळ कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करावे अशी मागणी काँग्रेस जिल्हा सरचिटणिस संजय भोसीकर यांनी जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कुरुळा गावाची लोकसंख्या किमान १२ हजार व आजूबाजूला ४० वाडी तांडे व खेडी आहेत. कुरुळा सर्कल मधील ६० ते ६५ हजार रुग्नाची गैरसोय होत आहे. त्याकरिता मौ कुरुळा ता कंधार जि नांदेड येथे ग्रामीण रुग्नालायाची आवश्यकता आहे. तरी तात्काळ ग्रामीण रुग्णालय मंजूर करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती मागणी काँग्रेस जिल्हा सरचिटणिस संजय भोसीकर यांनी व गावकर्यांनी केले आहे.
यावेळी विनायकराव कुलकर्णी,रामकिशन गंगावारे रेड्डी,डॉ.अक्षय नलाबले,बसवेश्वर मठपती,माधव किरपणे,नामदेव मुसांडे,बाजीराव धुळगंडे,ऋषिकेश गिरी आदीची उपस्थिती होती.