कंधार शहरातील 100 फुटाचा रस्ता प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी काढलेत्या आदेशानुसार काम सुरू करण्यासाठी माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

 

कंधार : प्रतिनिधी

कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हास्पीटल पर्यंत चा रस्ता अतिक्रमण हाटवुन 100 फुटाचा करण्यात यावा म्हणून जिल्हा अधिकारी यांनी काढलेले आदेशानुसार त्वरित काम सुरू करण्यात यावे म्हणून आज दि.23 जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली तथा सा बा विभाग नांदेड चे अधिक्षक अभियंता मा.श्री कोरे यांची माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या नेतृत्वाली भेट घेतली.

जिल्हाधिकारी आणि अधिक्षक अभियंता यांनी आदेशानुसारच काम करुन कंधार वासियांना न्याय मिळवून देऊ आसे आश्वासन देऊन संमधीत अधिकारी यांना आदेशीत केले.

 

दरम्यान महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा शंभर फुटाचा रस्ता करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा यासाठी कंधार तहसील कार्यालया समोर मातंग समाजाच्या वतीने अमरण उपोषण उपोषणकर्ते मारोती मामा गायकवाड कंधार यांनी सकल मातंग समाजाच्या वतीने आज दि.15 जानेवारी रोजी पासून पुकारले होते.

आज दि 23 रोजी शिष्टमंडळात माजी सैनिक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष कांबळे, पोचिराम वाघमारे, गोविंदराव सुर्यवंशी, माजी सैनिकजायभाये, माजी सैनिक पंदीलवाड यांची उपस्थिती होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *