-
प्रतिनिधी, कंधार
—————–
उज्वल प्रतिष्ठान, कंधारतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार यंदा कंधारचे प्रख्यात पत्रकार राजेश्वर कांबळे यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, ग्रंथ, मानाचा फेटा, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच एका समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. - राजेश्वर कांबळे हे प्रतिभावंत पत्रकार म्हणून ओळखले जातात. मागील वीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी विविध क्षेत्रावर विपुल लेखन केले आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक, निर्भीड, निष्पक्ष, भेदक, सर्वसमावेशक, विश्लेषणात्मक पत्रकारिता करत कंधारकरांचा आवाज बनले आहेत. सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढा देत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. सामाजिक क्षेत्रातही मोलाची भूमिका आहे. कंधार नगरपालिकेचे ते ब्रँड अॅम्बेसेडर होते. त्यांनी विविध संघटनेचे महत्वपूर्ण पदे भूषविले आहेत. जवळपास बारा लेख त्यांच्यावर प्रकाशित झालेले आहेत. आजवर नेहरू आंतरराष्ट्रीय सामजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकारत्न पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, पत्रकारिता सन्मान पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, मराठवाडास्तरीय शोधवार्ता पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
- उज्वल प्रतिष्ठान, कंधारतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. या वर्षीचे पुरस्कार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली होती. सदर निवड समितीने पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. सन २०२३ या वर्षीचा राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार कंधारचे प्रख्यात पत्रकार राजेश्वर कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, ग्रंथ, मानाचा फेटा, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.