शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक संपन्न

 

 

मुखेड : ( महेंद्र बोराळे  )

शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आज दिनांक 28-01-2024 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली याचीच पूर्व तयारी आढावा बैठक मुखेड येथे संपन्न झाला. सदरील बैठकीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहे यांनी केले.

आगामी काळात मुखेड काँग्रेसचे गत वैभव पुन्हा प्राप्त करू आणि जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करू आणि पुन्हा एकदा नांदेड जिल्हा काँग्रेसमय करू असा विश्वास मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर  यांनी व्यक्त केला.

 

यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाश घाटे,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे,दिलीप पाटील बेटमोगरेकर,शेषेराव चव्हाण,व्यंकटराव पाटील दापकेकर,अशोक पाटील रावीकर,शिवलिंग पाटील,बाबू पाटील कुंद्राळकर,माधव पाटील उंद्रिकर, डॉ.श्रावण रॅपनवाड,राजू पाटील रावणगावकर,सौ.मंगाराणी ताई अंबुलगेकर,संतोष बोनलेवाड,सौ.कविता कळसकर,

 

सौ.अनिता इंगोले,डॉ. रणजित काळे,गणपत पाटील मंडलापुरकर,चंद्रकांत घाटे,शौकत पठाण, गणपत गायकवाड,नंदू मडगुलवार,उत्तम चौधरी,हणमंत नारनाळीकर,अण्णासाहेब जाहिरे,एकनाथ पाटील वडगावकर, हेमंत घाटे,प्रवीण मोरे,के.एच. हसनाळकर,सूर्यकांत अल्लडवाड गुरुजी,गंगाधर पाटील,अदनान पाशा,विशाल गायकवाड,इम्रान पठाण,अविनाश काळे,जयप्रकाश कानगुले, अरूणाताई पत्रे,

अनिताताई राजूरकर,करुणाताई तेलंग,दिनेश अवडके यांच्यासह बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुखेड येथील युवा कार्यकर्ते गोविंद गडगेवाड व सौ.ज्योतीताई चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सावकर कोडगीरे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *