मराठा आरक्षणाला स्थगितीचे कंधार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध ;


कंधार ; 


सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने चालू असलेला मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असताना दिनांक ९ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.दि.१० रोजी कंधार येथे जाहीर निषेध करण्यात येवून निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

 तोंडा मुखाशी आलेला घास सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात बाजू भक्कमपणे न मांडल्याने मातीमोल झाला आहे. त्यामुळे सकल मराठा समाज  कंधारच्या वतीने तीव्र शब्दात यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून कंधार येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार आर्पण करुन सकल मराठा समाजाच्या वतिने सरकारचा निषेध करत काळ्या पट्या लावून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .

 सदरील आरक्षणासाठी दिलेली स्थगिती त्वरित उठून संबंध मराठा समाजाला न्याय देण्यात यावी अथवा मराठा परत रस्त्यावर उतरेल याची नोंद घेण्याचे आव्हान शासनाला करण्यात आले आहे. कंधार तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात निषेध निनमूद करण्यात आला आहे .


या निवेदनावर सकल मराठा समाजाचे  परमेश्वर जाधव, व्यंकट गव्हाणे, प्राध्यापक डॉक्टर मंगनाळे, संभाजी लाडेकर, गुलाबराव जाधव, नितीन कोकाटे, विलास सांगवे,परसराम तोरणे, राम गोरे, ज्ञानेश्वर तोरणे ,ओमकार शिंदे, अशोक कदम, हरिश्चंद्र शेंडगे, शहाजी शिंदे ,मोहन जाधव, शिवाजी रायरकर, सतीश देवकते ,हबू भाई ,संभाजी घुगे, प्राध्यापक किशन डफडे ,आनिल लाडेकर , बालाजी  कल्याणकर ,विकास मोरे ,डी.के.जाधव आदी समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *