आज पर्यंत कार्य करणारे कलेला उपजिवीकेचे साधन करणारे पेंटर कंधार पंचक्रोशीत सुपरिचीत आहेत.संगणकाच्या डिजीटल युगातही आपल्या कलेची छाप उमटवली.ज्या वेळी अपघातात जखमी झाल्या नंतर त्याचे कलादालन पेंटर संतुक गोलेगावकर आणि पेंटर टेकाळे यांनी सांभाळून त्यांना सहकार्य केले.
कंधारच्या सण-उत्सवात त्यांचा सहभाग ठळक असत.त्यांना मैत्री करण्याचा छंदच आहे.आप्त स्वकियांच्या सुख-दु:खात सहभागी होवून अग्रभागी होवून आपले योगदान देतात.त्यांना पर्यटनाचाही छंद आहे.त्यांनी मित्रा सोबत भारतातील पर्यटन स्थळांना भेटी दर वर्षी टूर काढुन करत.त्यांच्या सुनियोजनात अनेक टूर यशस्वी केले.
बहाद्दरपुरा नगरी ही कलेची खाणच..भाई गुरुनाथराव कुरुडे.सावळाराम कुरुडे,दत्तात्रय कुरुडे कै.शिवाजी एमेकर,कृष्णकांत पुलकुंडवार,अगदी अलिकडच्या काळात संकेत सुनिल कुरुडे असे कलारत्न आहेत.येत्या भविष्यातही अनेक कलावंत निर्माण होतीलही.माझे बंधु शिवाजी एमेकर हे जामखेड जि.जालना येथे कलाध्यापक असतांना त्यांना अकाली काळाने हिरावले.आजही विठ्ठल मंदिर बहाद्दरपुरा मंदिरावर त्यांनी सुंदर नाव कोरले आजही पाहता येईल.
तसेच अशोक टेलर्सचा साईन बोर्ड कालपरवा पर्यंत होता.त्यांना पेंटर सावळाराम कुरुडे यांच्या सोबत अनेक ठिकाणी कला सादर केली.बरेच साईन बोर्ड त्यांनी एकत्र काढले.मलाही कलेचा छंद लागला. या दोघांकडे पाहुन कलेचे आकर्षण निर्माण झाले.मी लहान म्हणजे चौथी-पाचवी असेल आमच्या घरी महालक्ष्मीची सजावट त्याकाळी उकृष्ट होत असत.गावात आमच्या लक्ष्मीची आरास लोकांना आवडत.
आम्ही म्हणजे नंदु माझे बंधु व मला त्या महालक्ष्मी आरास करण्याच्या रुम मध्ये आम्ही दबाधरन एका कोपर्यात आम्ही बसलो होतोत.तेंव्हा मोठेबंधु मारोतराव अन् पेंटर यांनी लहान असल्यामुळे आम्हा दोघांना कान धरुन बाहे काढले.आम्ही दोघेही रडत रडत एका ठिकाणी बसलो.पण…माझ्या जिद्दीने भरारी घेतली असता…माझ्या मनाला मी समजावले.नाराज व्हायचे नसते त्याच क्षणी माझ्या मनाला सांगीतलो.एक ना एक दिवस मला महालक्ष्मीची आरास कशी आहे,तु जरा बघ!असे म्हणन्या सारखे मला बनलं पाहिजे अन् खरच तसेच झाले.
माझी कलेची वाटचाल चालू झाली.त्यांच्याकडे म्हणजे पेंटरकडे वर्षाची ट्रेंनिग मला कलावंत बनण्याचे बळ देवून गेली.ज्या वेळी माझे बंधु कलाशिक्षक शिवाजीराव यांना माझ्या कलेबद्दल माहिती मिळाली.त्यावेळी नांदेडच्या शासकिय गुरु गोविंदसिंग रुग्नालयात मे 1990 या महिन्यात ते अॅडमिट असतांना भेट झाली.त्यावेळी त्यांनी म्हटले होते माझ्या जामखेडच्या रुमवर कलेचे वरेच साहिताय पडून आहे, ते तुला देणार आहे.पण 11 जुन 1990 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.पेंटर सावळारामजींना सर्व एमेकर परिवार सदस्य दादा या नावाने ओळखतात.
त्यांना व्यायामाचा छंद आहे.शरीर कसे कमवावे त्यांच्या कडून शिकले पाहिजे.आमच्ता एमेकर परिवाराचे निवासस्थान एकदम गावाच्या गडेला असल्यामुळे अन् त्याकाळात आमचेघर सधन होते.दरवर्षी हमखास चोरी व्हायचीच.उन्हाळ्यात पेंटर कुरुडे अन् शेजारचे राजेसाब शेख हे दाकदीचे होते.गल्लीत ते 12-2 दरम्यान रात्री गस्त घालत.ते नसतील त्या दिवशी मला भिती वाटत अन् झोप लागत नव्हती.
त्यांच्या गस्त घालण्याणं गल्लीस आधार वाटायचा.एकदा तर डाका टाकण्याची चिठ्ठी देवून आव्हान दिले होते.त्यावेळी आम्ही भांडे-कुंडे लादणीत टाकुन आम्ही गावातील लोकांना आम्ही सतर्क केले होते.पण योगायोगाने ते आलेच नाहीत.दररोज सकाळी पेंटर व्यायाम करुन शरीर सांभाळले.म्हणुन जीवनात झालेल्या अपघाताने डगमगले नाहीत.सहा महिने बेडवर होते.पण मोठ्या जिद्दीने त्यावर मात केली.त्यांची मातोश्री व आमची आत्या पार्वतीबाईंनी व त्यांच्या अर्धांगीनी खुप कष्ट करुन अपघात झाल्यानंतर खुप सेवा केली.म्हणुन त्यांची शैली पुर्वी सारखी झाली.
पेंटर कुरुडे यांच्याकडे कलेचा खजानाच आहे.ज्या वेळी भारताने 25 जुन 1983 साली विश्वकप जिंकला.त्यावेळी कंधार शहरात भारतीय क्रिकेट खेळाडूंनी लाॅर्डस् मैदानावर केलेल्या कामगीचा आनंदोत्सव कंधार नगरीत झाला.त्यावेळी आपल्या कलादालनाच्या समोर भारतीय खेळाडूंचे छायाचित्र लावून खेळाडूं प्रति प्रेम दाखवले.
त्यांना समाजात काम करण्या छंद आहे.बहाद्दरपुरा नगरी असो वा कंधार नगरी किंवा मित्र परिवार असो लग्नकार्यात रंगरंगोटी पासून स्टेज सजावट, स्वंयपाक कक्षात देखरेख ठेवून कार्यक्रम यशस्वी करतात.एमेकर परिवाराच्या कोणत्याही कार्यक्रमात व्यवस्थापक म्हणुन सुनियोजन करतात.त्यांच्या नियोजनात कार्यक्रम यशस्वी होतो.
अंत्यविधीच्या वेळी पुढाकार घेवून शेवट पर्य॔त काम करतात.असो कोणताही कार्यक्रम सामाजिक असो वा वैयक्तीक असो तन,मनाने त्या कामात झोकुन देवून काम नेटाने करतात.कोणतेही अभिलाषा न ठेवता काम करतात.आजच्या युगातही त्यांची तीच तळमळ दिसते
त्यांनी आदिवासी नागलॅडचे नागानृत्य करण्यासाठी त्यांनी वेशभुषा गणेशोत्सवात साकारुन भगवान बिरसामुंडाच्या कार्याचे स्मरण केले….
….क्रमश;
दत्तात्रेय येमेकर