कंधार : येथील माजी उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान यांचे मोठे बंधू युसुफ खान यांच्या घरी मागील महिन्यांपूर्वी मोठी चोरी झाली असल्याने मोठी खळबळ उडाली होती.यात 27,50,000/( सत्तावीस लाख पन्नास हजार ) रोख रक्कम चोरी झाली होती.कंधारचे साह्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने मोठ्या शिताफीने पंधरा दिवसाच्या आत तपासाची चक्रे फिरवून चोरी झालेली रक्कम वसूल केली. ती रक्कम दि 26/01/ *2024*रोजी*मा.जिल्हाधिकरी श्री अभिजीत राऊत व जिल्हापोलीस अधिक्षक, श्री श्रीकृष्ण कोकाटे (भा.पो.से.) एलसिबीचे पोलीस अधिकारी श्री उदय खंडेराय यांच्या हास्ते माजी नगरसेवक मुश्ताक खान यांना शंभर टक्के चोरी झालेली रक्कम पोलीस मुख्यालय नांदेड येथे परत करण्यात आले.
पोलिस प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल व या कामी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे त्या सर्वांचे खान परिवाराच्या वतीने आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.*