थेट बँकेच्या व्यवहारातूनच विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण ; बोळका येथील राजीव गांधी विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

कुरुळा ( विठ्ठल चिवडे )

विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक बदल व्हावेत त्याचे व्यवहारात उपयोजन व्हावे याचा ध्यास नेहमीच सर्जनशील शिक्षकांना असतो.औपचारिक शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थी जेंव्हा बाहेर पडतो तेंव्हा बहुतांश वेळा पुस्तकी ज्ञान असूनही व्यवहारज्ञान अल्प असल्यामुळे शिक्षण असूनही गोंधळ उडतो नेमका याच बाबीचा वेध बोळका येथील राजीव गांधी विद्यालयाचे मु.अ.मारोती तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला व शाळेतील विद्यार्थ्यांना थेट बँकेच्या प्रत्यक्ष व्यवहारातूनच व्यवसाय कसा उभा करावा,बँकेतील व्यवहार कसे करावेत आदी बाबींचा अनुभव दिला याचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

कुरुळा येथून जवळच असलेल्या बोळका येथील राजीव गांधी विद्यालयाची विशेष ख्याती आहे. नेहमीच सामाजिक कार्यासह नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवणारी शाळा अशी ओळख आहे.सद्या प्रजासत्ताक दिनानिमित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी अनेक शाळांतून मैदानी खेळांसह कौशल्यात्मक खेळावरही भर देण्यात येत आहे. यात बहुतांश शाळेतून परंपरागत चालत आलेले क्रीडा प्रकार व बौद्धिक खेळ घेतले जात आहेत.परंतु राजीव गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक मारोती तुपकर आणि गुरुडे डी. बी. व अन्य सहकाऱ्यांनी वर्तमानातील सुशिक्षितांच्या अडचणी पाहता आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग व्यवहारज्ञान देण्याचे ठरवले.त्याप्रमाणे त्यांनी कुरुळा येथील आय.डी. बी.आय. बँकेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला व ता.२५ जानेवारी रोजी शाळेत बँकेतील कर्मचारी दाखल झाले.सर्वप्रथम बँक कर्मचाऱ्यांनी बँकेचे व्यवहार कसे चालतात,स्लिप कशी भरावी,कर्ज कसे मिळवावे आदी बाबींची सखोल माहिती दिली व प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांतुन शाखा व्यवस्थापक म्हणून प्रीती कदम,रोखपाल शबनम शेख व निखिल कांबळे,लिपिक प्रथमेश नलाबले व श्रीनिवास कदम,फिल्ड ऑफिसर मेघा कदम तर सेवक शिवशंकर जाधव अशी निवड करण्यात आली.यातून व्यवसाय उभारणीसाठी (आनंदनगरीसाठी) विद्यार्थ्यांना प्रतक्ष कर्ज देऊन त्यातून व्यवसायातील नफा वगळता त्यावरील व्याजदर आकारासह पुन्हा परतफेड अशी रचना करण्यात आली आहे.

यावेळी शाळेतील कर्मचारी श्री चिट्टे एस एम,श्री मुळके बी बी,श्री बनसोडे एस जी, श्री गुट्टे ए एस, श्री जाधव आर पी,श्री कदम एम एल,श्री तुपकर एन आर लिपिक श्री कदम व्ही एस व सेवक श्री चव्हाण एस एल, श्री कदम पी बी, शेख एम एम आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *