संयम , जिद्द आणि सातत्याच्या बळावर वयाच्या ४८ व्या वर्षी शंकर डांगे ची तलाठी पदासाठी निवड..

 

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

माणसाच्या अंगी संयम , जिद्द आणि अपार कष्टाचे सातत्य असेल तर नक्कीच यश पदरात पडते याचीच अनुभूती नुकतीच कंधार तालुक्यातील फुलवळ वासीयांना शंकर डांगे यांच्या माध्यमातून आली आहे. ते म्हणजे येथील शंकर शेषेराव डांगे उच्य शिक्षित पदवीधर असून नुकतीच तलाठी पदासाठी ची निवड यादी जाहीर झाली त्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी पदासाठी त्यांची वयाच्या ४८ व्या वर्षी ही निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फुलवळ ता.कंधार येथील शंकर डांगे वय ४८ वर्ष , यांचं प्राथमिक शिक्षण येथील जि. प. शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे झाले. पुढे बीए पदवी चे शिक्षण पूर्ण होते न होते आई-वडिलांनी शंकर चे लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगा , दोन मुली असे आपत्यही झाले. स्वतःची शेती फक्त ३० गुंठेच असून शिक्षण पूर्ण होताच त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्नही केले परंतु त्यात यश मिळाले नाही.

साल १९९९ ते २००१ या कालावधीत तहसील कार्यालय अंतर्गत फुलवळ तलाठी सज्जा येथे पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून त्यांनी येथे सहाय्यक तलाठी म्हणून कामकाज केले. तेंव्हापासून त्यांना आपल्याला कधीतरी आणि कुठेतरी नक्कीच शासकीय नोकरी मिळेल असा दृढ विश्वास होता.

म्हणून त्यांनी संयम व अभ्यास करण्याचे सातत्य सोडलेच नाही. शेवटी त्यांनी आहे तेवढ्याच शेतीत मनोभावे मेहनत करून कुटुंबाचा गुजरा होईल असे उत्पन्न काढायला सुरुवात केली. त्यातच वयाच्या मानाने त्यांचे लेकरं दिवसेंदिवस मोठे होऊ लागले आणि त्यांच्या शिक्षणाचा बोजा पुन्हा वाढला. असे असतानाही त्यांनी मुलाचे पॉलिटेक्निक मेकॅनिकल ब्रँच पूर्ण करून घेतले तर एका मुलीची बिफॉर्मसी ची पदवी पूर्ण केली आणि एका मुलीचे बारावी सायन्स पर्यन्त चे शिक्षण पूर्ण केले. कालांतराने दोन्ही मुलींचे लग्न करून दिले. शंकर डांगे आजघडीला नातवंडाचे आजोबा ही झाले. पण वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांची तलाठी पदासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *