कंधार : येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम सय्यद सईदोद्दीन रफाई रहे. (बडी दर्गाह) यांच्या ७०९ व्या उर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. २७ रोजी गुसल शरीफने उर्साचा प्रारंभ झाला असून आज रविवार दि.२८ जानेवारी रोजी संदल मिरवणूक निघणार आहे.
कंधार येथे सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई रहे. यांच्या ७०९ व्या उर्साला काल गुसल शरिफने प्रारंभ झाला असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कुस्त्यांची दंगल, कव्वाली, हास्य कवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन रविवार दि.२८ जानेवारी रोजी संदल मिरवणूक निघणार आहे. अशी माहिती बडी दर्गाहचे सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसेनी रफाई व मुतवल्ली सय्यद शहा मुजतबा मोहियोद्दिन हुसेनी रफाई यांनी दिली.
आज दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नमाज नंतर बडी दर्यातुन संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोमवार दि.२९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल तर रात्री ८ वाजता टी.व्ही. स्टार गायक हबीब अजमेरी (नागपूर) यांच्या कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता हास्य कवी संमेलनाचे आयोजन
करण्यात आले आहे.या हास्य कवी संमेलनात सज्जाद झंझट रूडकी (उत्तराखंड), वाहेद अन्सारी, सुंदर मालेगावी (मालेगाव), ईस्माइल नजर (मध्यप्रदेश), राजेंद्र शर्मा, अलतेमश तालीब, अरशद नुरी कंधारी, सोहेल सिद्दिकी (नांदेड), महेनाज स्योहरवी (उत्तर प्रदेश), सलीम रशदी (जिंतूर) इत्यादी कवी सहभागी होणार आहेत.
तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बडी दर्गाचे सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसेनी रफाई, मुतवल्ली सय्यद शहा मुजतबा मोहियोद्दिन हुसेनी रफाई व बडी दर्गाह उर्स कमिटी चे अध्यक्ष तथा कंधार नगरीचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन यांनी केले आहे.