केशवप्रभासुत अँड.मुक्तेश्वरांना पेन्सिलचे प्रतिमा स्केच देऊन सिध्दोधन सोनसळे कलाकाराने केला सत्कार.

कंधार : प्रतिनिधी

मन्याड खोरे म्हणटले की,आठवते कलावंताची अन् चळवळीची भूमी चळवळ म्हणटले की डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब आणि कला म्हणटले की भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेची उभारणीच दिन-दुबळ्या,सुग्या-मुग्यांच्या लेकरांना घरची भाकरी खाऊन गावतच शिक्षण घेण्याची सोय १९४८ च्या शिवजयंती पासून सुरुवात झाली.आज पर्यंत अनेक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.नामांकित कलावंत मन्याड खोर्‍यात झाले.

ती देण श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारची आहे.कंधार तालुक्यातील मौजे मजरे धर्मापूरी ता.कंधार येथील अँड मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब यांचे काॅलेज जीवनातील एन.सी.सी.मधील वर्ग मित्र व श्री शिवाजी हायस्कूल कंधार शाळेचा माजी विद्यार्थी,सध्या उदरनिर्वाह भाजी-पाला विक्रेता शिवाजी सोनसळे यांचा चिरंजीव सिध्दोधन सोनसळे या पेन्सिल स्केच कलावंत अवलियाने शिवसेना नेते, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सहसचिव मा. अँड.मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब यांचे भाषण देतांनाची हुबेहूब पेन्सिल स्केच रेखाटून दि २९ जानेवारी २०२४ रोजी श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात सत्कार केला.

त्या प्रसंगी आदरणीय अँड मुक्तेश्वरराव भाऊनी त्या बहाद्दर कलावंताचा यथोचित सत्कार करुन बक्षीस देवून गौरव केला.कलावंत सिध्दोधन शिवाजी सोनसळे मजरे धर्मापूरीकर हा उपजत कलावंताचे भविष्य उज्ज्वल आहे.कधी अडचण आल्यास मला भेट असे सहकार्यग्दोर
काढले. या समयी उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर,गोविंद अनकाडे सर,ज्ञानोबा कुरे सर,शुभम अल्लडवार सर,दत्तात्रय एमेकर, सारथी युवराज पाटील.लूंगारै ,मन्मथ पेठकर सह आदिजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *