नांदेड (प्रतिनिधी) सहकारी पतपेढी शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेडच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड संपन्न झाली.चेअरमनपदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील सर्वप्रथम स्थापित जुनी आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास सहा हजार शिक्षक सभासद असलेली सहकारी पतपेढी शिक्षण विभाग म. जि.प.नांदेडच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड संपन्न झाली असून तीत चेअरमन पदी अखिलचेजिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर तरव्हाईस चेअरमन म्हणून जयश्री देशमुख (मुळे) आणि सचिव पदी बाबुराव कैलासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाची गतवर्षी चुरशीची निवडणूकीत शिक्षक एकता पॅनलवर शिक्षक सभासदांनी विश्वास व्यक्करत १५ पैकी १२ संचालक निवडूनदेत एकहाती सत्तादिली आहे. या संचालकांतून निर्वाचन अधिकारी योगेश बाकरे सहाय्यक सहकारी अधिकारी सहकारी संस्था नांदेड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कार्लेकर, सहकार अधिकारी श्रेणी दोन सहकारी संस्था नांदेड यांनी दि. २८ जानेवारी रोजी घेतलेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेद्वारे चेअरमनपदी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर, व्हा. चेअरमनपदी अखिल शिक्षक संघाच्या महिला पदाधिकारी राजश्री रामराव देशमुख – मुळे तर सचिवपदी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कैलासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक सुधाकर थडके,दिलीप देवकांबळे, संगिता माळगे, प्रल्हाद राठोड,संजय अंबुरे,माणिक कदम,बालासाहेब लोणे,दत्ता बंडूपा.भोसले, हनुमंत जोगपेठे,संतोष आंबुलगेकर यांची उपस्थिती होती.
या निवड प्रक्रिये नंतर उपस्थीत शिक्षक सभासदांनी जल्लोश करीत नवंनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षक एकता पॅनलचे प्रमुख नेते देविदासराव बसवदे, जीवनराव वडजे,दिनकर हनमंते, प्रकाश मुंगल, चंद्रकांत दामेकर,अशोक पवळे, अखिलचे प्रदेश संघटक चंद्रकांत मेकाले,बाबुराव फसमले, पी.डी.पोले,फारुख बेग,गंगाधर मंगनाळे, ज्ञानेश्वर कल्याणकर,रमेश गोवंदे,जयवंत काळे,गंगाधर मावले,जे.डी.कदम,शिवाजी सावते, माधव पचलिंग,डी.एस.धात्रक,गणेश कदम,अरविंद सुर्यवंशी,दत्ताजी पांचारे,एस.डी.शिंदे,गुणवंत सोळंके,शेख समदानी,जी टी.कदम,संतोष कदम, विजयआमटे,आर.आर.पाटील,अजित कदम, भगवान चव्हाण,प्रमोद पाटील,सुरेश बाराळे, एम.टी .जाधव,मंगल सोनकांबळे, एम.ए.शेख, मारोती गायकवाड,विश्वनाथ पाटील, मोहसिन पठाण,मिथून मंडलेवार,अशोक पाटील, डी.एन.पाटील,सुभाष पाईकराव,बालाजी चक्रधर,विलास जाधव,संजय वडवळे,भगवान जाधव,भुजंग येडे,अनिल दुगाणे,गजानन मुरडले आदींची उपस्थिती होती.