अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना पाळावयाची बंधने ध्यानात ठेवून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो कौतुकास्पद आहे. रेल्वेच्या चाळीस हजार बोगी वंदे भारत ट्रेन सारख्या करण्यात येणार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार आहे. कराच्या स्लॅब मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. या अर्थसंकल्पामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी चा मार्ग सुकर झाल्यामुळे याला ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर
(भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नांदेड)