प्रलंबित सेवानिवृत्ती उपदान -सेवानिवृत्ती अंशराशीकरण , गट विमा- योजना , सातव्या वेतन आयोगाचे थकीत भविष्य निर्वाह हप्त्याच्या रक्कमा सह प्रलंबित देयके सेवानिवृत्तांच्या खात्यात त्वरित जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेची मागणी

 

 

नांदेड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना राज्य पदाधिकारी व जिल्हा शाखा नांदेड पदाधिकाऱ्यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील पात्र सेवानिवृत्त शिक्षक ,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे दीर्घ कालावधीपासून प्रलंबित सेवानिवृत्ती उपदान -सेवानिवृत्ती अंशराशीकरण , गट विमा- योजना , सातव्या वेतन आयोगाचे थकीत भविष्य निर्वाह निधीचा दुसरा ,तिसरा व चौथ्या हप्त्याच्या रक्कमा, थकीत वेतन, जानेवारी 2022 व जुलै 2023 महागाई भत्ता फरकाच्या रकमा* *इत्यादी* *प्रलंबित देयके सेवानिवृत्तांच्या खात्यात त्वरित जमा करणे बाबत मागण्यांचे निवेदन मा. मीनल करणवाल मॅडम ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नांदेड मा. सविताताई बिरगे मॅडम ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नांदेड तसेच मा. ओमप्रकाश चन्ना ,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जि. प .नांदेड यांना देण्यात आले .

 

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर गोडघासे ,राज्य संघटक बालाजी डफडे , जिल्हाध्यक्षा विजयाताई घिसेवाड जिल्हा सचिव रमेश गोंवदे, जिल्हा उपाध्यक्ष शेख मगदूम, जिल्हा नेते शेख रियाजुद्दीन ,* *कंधार तालुका अध्यक्ष गणपतराव गुट्टे, मुखेड ता.सचिव नामदेवराव गायकवाड, भोकर तालुकाध्यक्ष सुरेशराव मुपडे, धर्माबाद तालुकाध्यक्ष प्रभाकरराव कमटलवार, हदगाव तालुका सचिव सागर शिंदे ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी* *जीवनराव शेवाळकर ,बालासाहेब डावकरे,सेवा निवृत्त केंद्रप्रमुख* *बबनराव नवघरे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक शंकरराव चंबलवार, उषाताई कोंडेकर, ललिता नाईक , जी एम शिरसे ,शेख मेहताब इ. बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक , मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, शिक्षणं विस्तार अधिकारी* *उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *