महात्मा फुले प्राथमिक शाळेत आनंदनगरी कार्यक्रमातून विद्यार्थांना नफा तोट्याची माहिती

 

कंधार : प्रतिनिधी

आज दिनांक 30 /1 /2024 रोजी कंधार येथे महात्मा फुले प्राथमिक शाळेत आनंदनगरी कार्यक्रम घेण्यात आला. एरवी शाळेत आवघड समजला जाणारा गणित विषयातील आर्थिक व्यवहार व नफा तोटा आदीसह किचकट प्रश्नाची उकल प्रत्यक्ष अनुभवातून आनंद नगरीच्या माध्यमातून खर्च आणि उत्पन यातून विद्यार्थांनी समजून घेतले. यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव चेतनभाऊ केंद्रे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून चिमुकल्यांना मार्गदर्शन केले.

 

 

माजी सैनिक शेख अजीज, माधव भालेराव संपादक हिंदवी बाणा, पत्रकार सय्यद हबीब,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.जी केंद्रे आदीची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. माजी सैनिक शेख अजीज यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून आनंदनगरीचे उदघाटन रिबीन कापून केले.

अनेक चिमुकल्यांनी भाग घेऊन उत्साहात आपआपली स्टॉल, दुकाने लावली, इडली वडा, मठ्ठा, चिक्की, दही धपाटे, चहा, लस्सी, खिचडी भजे, पापड, भेळ, . चकली,पाणिपुरी, मुरकुल, उसळ, चविडा, पॅटीस,ब्रेड पाव, पाव वडा, वडापाव, पास्ता,खाऱ्याड्या, साबुदाना वडा, डोसा, अपपे आदीसह रुचकर पदार्थाचे दुकाने मांडली, जवळपास दहा हजाराची उलाढाल झाल्याची माहीती सांस्कृतिक प्रमुख सौ.यु एम. कागणे यांनी दिली.

यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.जी केंद्रे यांनी सर्व चिमुकल्याने तोंड भरून कौतूक केले व सर्व प्रजासत्ताक दिना निमित्य आयोजित उपक्रमात सहभागी व विजयी विदार्थांना शुभेच्छा दिल्या.

तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.जी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावणा करून सर्व मान्यवरांचे आभार मानले. सौ. कागणे यु एम, श्री आगलावे ए बी, केंद्रे आर एस, माणिक बोरकर, चंद्रकला तेलंग आदीनी आनंदनगरी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *