भारताला सशक्त आणि आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हा संपूर्ण देशवासियांसाठी मंत्र दिला. आणि याच गोष्टीला बळकटी देण्यासाठी देशाच्या विविध भागांसह महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात लोकसभा सदस्य अर्थात लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत या योजना काय आहेत, यासाठीचा उत्तम प्रयत्न करण्यात आला. भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी जनसामान्यापर्यंत पोहोचविली.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या मांडणीत एक स्वाभाविक सुसंगती आहे. ‘सबका साथ, सबका विकास!’ या घोषणेने समानता आणि सामाजिक/आर्थिक न्याय या दोन्ही संकल्पना त्यात आहेत! सगळ्यांनीच एकमेकांची साथसंगत केली/घेतली, तरच सर्वांचा विकास शक्य आहे, या मांडणीतही सामाजिक व राष्ट्रीय स्वावलंबनाचा संदेश आहेच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’सारख्या कार्यक्रमांना पुरेसे पाठबळ देण्याचा प्रयत्न करून उद्योजकता विकासावर भर दिला. रोजगाराचा मुख्य स्रोत आता, पारंपरिक चौकटीतील ठरावीक वेळेच्या व ठरावीक वेतनाच्या नोकऱ्या हा राहू शकणार नाही आणि त्यामुळे उद्योजकतेच्या विकासाकडे वळणे भाग आहे हे ओळखून सुरू केलेली ‘मुद्रा’ कर्ज योजना हे याच भूमिकेचे फलित होते.
आणि म्हणूनच नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपर्यंत भारत सरकारच्या योजनांची माहिती संक्षिप्त रूपाने पोहोचण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तिकेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास आत्मनिर्भर करण्यासाठी अग्निपथ योजना, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, ऑपरेशन ग्रीन योजना, मत्स्यसंपदा योजना, विवाद से विश्वास योजना, पी एम वाणी योजना, उत्पादन लिंक प्रोत्साहन योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना, आयुष्यमान सहकार योजना, स्वामित्व योजना, पीएम मोदी हेल्थ आयडी कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण तथा शहरी), आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, मातृत्व वंदना योजना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी योजना, अंत्योदय अन्न योजना, स्वनिधी योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, फ्री सिलाई मशीन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, फ्री सोलर पॅनल योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री पेन्शन योजना या योजनांबाबत माहिती देण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त जनसामान्यांना फायदा व्हावा, आणि पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारताची निर्मिती व्हावी, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
देशात माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याने सामान्यांचे जनजीवन उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे आपल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441