मुखेड : प्रतिनिधी
येथील मातोश्री भीमाई व्यख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने दि. ६ फेब्रुवारी रोज मंगळवारी सायंकाळी ६.०० वाजता कोत्तावार ऑईल मील बाऱ्हाळी रोड येथे, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ अनंत सूर्यवंशी व प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे यांचे हृदयरोगाची कारणे, उपचार- लक्षणे प्रतिबंध, सी पी आर, जीवन संजीवन प्रातेक्षिकासह आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेच्य अध्यक्षस्थानी आमदार डॉ. तुषार राठोड उपस्थीत राहणार असून याप्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. त्रंबक दापकेकर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार देऊन संयोजन समितीच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे उपस्थित राहणार आहेत. मुखेड येथील सुप्रशिध्द् सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ . दिलीप पुंडे यांनी गेल्या १० वर्षापासून आपल्या आईच्या नावाने स्मृतिप्रीत्यर्थ मातोश्री भीमाई व्याख्यानमालेची सुरुवात केली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी आई या विषयावर गुंफले, दुसरे पुष्प सातारा येथील प्रशिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर गुंफले, तिसरे पुष्प सातारा येथील डॉ. राजेंद्र पवार यांनी सुजाण पालकत्व या विषयावर गुंफले, चौथे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा . तेज निवळीकर यांनी एकविसाव्या शतकासमोरील आव्हाणे या विषयावर गुंफले. पाचवे पुष्प पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ . रामचंद्र देखणे यांनी ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस … या विषयावर गुंफले, सहावे पुष्प जेष्ठ समाजसेवक तथा जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक अमरावती येथील डॉ. अविनाश सावजी यांनी शतायुषी व्हा, पासवर्ड आरोग्याचा या विषयावर गुफले, सातवे पुष्प ताण तणाव तथा नातेसंबंध समूपदेशक डॉ. सचिन देशमुख औरंगाबाद हे स्वभावालाही औषध असते या विषयावर गुंफले, आठवे पुष्प औरंगाबाद येथील जगन्नाथ दिक्षीत यांनी विनासायास वेट लॉस या विषयावर गुंफले, नववे पुष्प नांदेड येथील डॉ . श्रीराम राठोड व महाराष्ट्र राज्याचे अपंग विभागाचे माजी आयुक्त आर.के. गायकवाड यांनी विपश्चना परीचय व अनुभूती या विषयावर गुंफले तर 10 वे पुष्प जीवन ज्यांना कळले हो या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रशिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ . यशवंत पाटणे , (सातारा) यांनी गुंफले आहे, 11 वे पुष प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी पसायदान विषयावर गुफले. तर दिनांक सहा फेब्रुवारी रोज मंगळवारी फिनिक्सचे जेष्ठ फिजिशियन डॉ. अनंत देशमुख व ग्लोबलचे
इंटरव्हेशनल कॉर्डियॉलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे हे हृदयरोगाची कारणे, उपचार- लक्षणे प्रतिबंध, सी पी आर, जीवन संजीवन प्रातेक्षिकासह आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक पुष्पात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा सन्मान प्रतिवर्षी करण्यात येतो. हृदयरोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले असून मृत्यूदरसुद्धा वाढला आहे. स्पर्धांच्या युगात ताणतणाव वाढला असून जीवनशैली बदलली आहे. आपल्या हृदयाची काळजी पप्रत्येकाने घेण्याची गरज आहे
दि. 6 रोज मंगळवारी, फिनिक्सचे जेष्ठ फिजिशियन डॉ. अनंत देशमुख व ग्लोबलचे इंटरव्हेशनल कॉर्डियॉलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे हे तपपुर्तीपुष्प गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मुखेडभूषण डॉ . दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे, डॉ. तेजस्वीनी पुंडे , यांच्यासह मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.