कंधारच्या महात्मा फुले शाळेची सहल माहुर गडावर ; सहस्त्रकुंड व उनकेश्वर स्थळांना दिल्या भेटी

कंधार 🙁 तालुका प्रतिनिधी)

महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय संभाजीनगर नवामोंढा कंधार या शाळेची शैक्षणिक सहल दि.2 फेब्रुवारी रोजी सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर, गरम पाण्याचे झरे उनकेश्वर आदी ऐतिहासिक स्थळांना भेट देत रेणूका माता, दत्तगड, अनुसया माता माहुर येथे दर्शन घेतले व वनभोजनाचा आनंद घेतला.

 

 

प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा विद्यालयात करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय संभाजीनगर नवामोंढा कंधार या शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंशासन दिन, आनंदनगरी, मैदानी खेळाचे

 

 

नियोजनासह शैक्षणिक सहलीचे आयोजन यावर्षी सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर, गरम पाण्याचे झरे उनकेश्वर आदी ठिकाणी भेट देवून भौगोलीकदृष्ट्या महत्वाच्या स्थळाची माहीती घेतली. व माहूर येथिल रेणुकामाता मंदीर, दत्तगड, अनुसया माता चे दर्शन घेतले.

 

महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुखाध्यापक वाघमारे डी.जी. व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जे.जी. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचे शिक्षक राजू केंद्रे, सौ. कागणे यु एम, माणिक बोरकर, चंद्रकला तेलंग, गिरजाबाई हाकदळे,

 

 

तसेच महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार शाळेचे शिक्षक बी एस गुट्टे, एच के केंद्रे, जि टी गुट्टे, जाधव सी बी, फिरदोस शेख , लिपिक के पी आगबोटे,वी डी चव्हाण , सेवक इबू केंद्रे,आदीसह विद्यार्थी उपस्थित होते .

 

दि. 2/02/2024 रोजी आमच्या #महात्मा_फुले_प्राथमिक व #माध्यमिक विद्यालय #कंधार ची #शैक्षणिक_सहल नांदेड जिल्ह्यातील # सहस्त्रकुंड धबधबा येथे भेट दिली. विद्यार्थांनी धबधबा पाहीला. या ठिकाणी #वनपरीक्षेत्र अधिकारी #इस्लापूर प्रादेशिक, फिरते #पथक कार्यालयाच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला.

वनपाल शफी पठाण, गणेश पवार, समाधान राऊत आदीनी आमचा सत्कार केला.

 

 

 

 

दि. 2/02/2024 रोजी आमच्या #महात्मा_फुले_प्राथमिक व #माध्यमिक विद्यालय #कंधार ची #शैक्षणिक_सहल नांदेड जिल्ह्यातील #उनकेश्वर_मंदीर येथे #दर्शन घेतले व #गरम_पाण्याचा_कुंड पाहीला. तसेच येथिल #शासकीय #विश्रामगृह येथे #वनभोजन केले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *