त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

 

प्रतिनिधी, कंधार

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२६ व्या

जयंतीनिमित्त आज बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कंधार येथे भारतीय बौद्ध महासभा ता. शाखा, कंधारच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सूर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक, भीमगड येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा ता. शाखा, कंधारच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *