शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षा आमदार उमाताई खापरे यांच्यासमवेत प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा

 

 

 

शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षा आमदार उमाताई खापरे यांच्यासमवेत प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक कां.रं,तुंगार, मुख्यसचिव विठ्ठल उरमुडे, राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, महिला आघाडी प्रमुख रसिका परब यांनी पुणे येथे उमाताई खापरे यांची भेट घेतली.

उमाताईंनी प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी त्वरित शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक यांना फोन करून सहविचार सभेसाठी वेळ देण्याबाबत सांगितले व व तसे पत्रही आयुक्त आणि संचालकांना दिले.

तसेच मा. शिक्षणमंत्री यांच्या समवेत शिक्षक महासंघाची सहविचार सभा घेण्याबाबत शिक्षणमंत्री यांची समक्ष भेट घेणार असल्याचे उमाताई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *