दि.२० मार्च २००१ ते २१ मे २००४ या कालखंडात प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात नितीशकुमार हे रेल्वे मंत्री असतांना म्हणजे २० वर्षा पूर्वीच्या माजी खासदार व आमदार,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या दूरदर्शी मागणीला यश मिळाले.
ही मागणी करतांना जवळापास त्याच्या नकाशाच्या ५०० प्रती संबधीत केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्री आणि उर्वरित प्रती अधिकाऱ्यांना मागणीच्या प्रती पाठवून मागणी केली होती.वरील मागणीच्या निवेदनावर डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब, भाई कुरुडे, भाई पेठकर, अँड. धोंडगे,प्रा.कळणे,चव्हाण गुरुजी, घोरबांड गुरुजी,डाॅ.प्रा.गवते, डाॅ.प्राचार्य नागपूर्णे,एमेकर गुरुजी,प्रा.आंबटवाड पुरुषोत्तम धोंडगे, तानाजी पेठकर आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.या ऐतिहासिक मागणीची बातमी सा.जयक्रांति प्रसिद्ध झाली होती.
एक लोहमार्ग मंजूर झाला आहे.उर्वरित लोहमार्ग मंजुरीच्या प्रतिक्षेत या निवेदना सोबत नकाशा रेखाटण्याची संधी मला मिळाल्याने खरच हे माझे सद्भाग्य समजतो.! लोहमार्गास निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व मानाची कोटी-कोटी जयक्रांति!