सलग तिसऱ्या दिवशी फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात.. कार व ऍपे ऑटो ची समोरासमोर धडक , त्यात आटोतील दोघे जखमी तर कार चालकाला किरकोळ दुखापत..

 

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

नांदेड ते उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर फुलवळ च्या आसपास सातत्याने अपघाची शृंखला सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी ही फुलवळ पासून जवळच असलेल्या महादेव मंदिर ते जांब रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कार गाडी क्रमांक एमएच ०५ बीजे १०२३ व ऍपे ऑटो गाडी क्रमांक एमएच २६ बिडी ०३०५ या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. त्यात आटोतील दोघे जखमी तर कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कार मधील अन्य प्रवासी सुखरूप आहेत.

 

अधिक माहिती अशी की ऍपे आटो चालक अक्षय हणमंतराव भवाळ व हणमंत निवृत्ती भवाळ हे पिता-पुत्र लोहा बाजारात आपला कापूस विक्री करून लोहा वरून जांब कडे जात होते तर कार चालक मनोज वाढवे हे प्रवाशी शाहरुख शेख व त्यांचे कुटुंबीय त्यात दोन महिला व चाल लहान लहान मुले यांना घेऊन सावरगाव-जांब येथून कळमनुरी जि. हिंगोली कडे जात होते.

 

 

फुलवळ येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरून सदर दोन्ही वाहने जात असतांना समोरासमोर धडक होऊन अपघात झाला , परंतु सुदैवाने किरकोळ दुखापतीपलीकडे कसलीच जीवितहानी झाली नसल्याने सर्वचजण बालबाल बचावले असेच म्हणावे लागेल. घटनास्थळी दोन्ही गाड्यांची धडक होताच खूप मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला शिवारात असलेले शेतकरी व वाटसरू धावून आले आणि दोन्ही गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला कळवले तसेच कंधार पोलीस ठाण्यात ही कल्पना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *