नांदेड : प्रतिनिधी
एकाच दिवशी भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार आणि फिनिक्स ह्युमॅनिटी नॅशनल अवॉर्ड हे दोन पुरस्कार धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना मिळाले असून त्यांच्या पुरस्कारांची संख्या ८७ झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रविवारी गुरुग्रंथ भवन येथे नानक साई फाउंडेशन व महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तर्फे संत नामदेव साहित्य संमेलना आयोजित करण्यात आले होते.यामध्ये ख्यातनाम कवि फमू शिंदे, संमेलनाध्यक्ष प्रा. जगदीश कदम, स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकरे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, महाराष्ट्र साहित्य मंडळाचे सदस्य दिनेश आवटी व विलास सिदंगीकर ,सरदार तेजेंद्रसिंघ मक्कर यांच्या हस्ते दिलीप ठाकूर यांना “भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार ” देऊन गौरवण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्षांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, कोणत्याही आमदारापेक्षा दिलीप ठाकूर यांचे कार्य सरस आहे.
दुपारी झालेल्या कार्यक्रमात जागतिक कर्करोग निवारण दिनानिमित्त प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या इंदिरा माधव
सभागृहात पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये वीर रसाचे प्रसिद्ध कवी सरदार रणजितसिंघ चिरागीया, जेष्ठ गायिका सौ.रेखा मनाठकर,
सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार एस.एम.कदम (सुखानंद),
दिलीपकुमार धुळे जास्त दिलीप ठाकूर यांना ” फिनिक्स ह्युमॅनिटी नॅशनल अवॉर्ड ” देऊन सन्मान करण्यात आला.
सौ.जयश्री ठाकूर, सौ.सुनीता चौहान, राजेशसिंह ठाकूर, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुखानंद महाराजांनी असे सांगितले की,सेवाधर्म हाच मानवी धर्म समजून समाजातील गोरगरीब, अनाथ, वेडसर, लोकांसाठी भाऊंचा डबा, चरणसेवा, मायेची उब, कायापालट, सेवा ही संघटन, भाऊचा माणुसकीचा फ्रिस, कृपाछत्र, उन्हाळ्यात पानपोई, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम आदी सामाजिक उपक्रमासह इतर समाज उपयोगी उपक्रम जसे की नरेंद्र देवेंद्र महोत्सव, बहना भाग मत जाना, अमरनाथ यात्रा, गोदावरी गंगापूजन, मोठ्या पडद्यावर क्रिकेट स्पर्धा दाखवणे, राष्ट्रभक्तीपर चित्रपट मोफत दाखवणे, आदी उपक्रम दिलीप ठाकुर हे राबवित आहेत.
वर्षभरातील जगावेगळे ८५ उपक्रम राबविणार्या दिलीप ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, कर्मयोगी, दीनबंधू सेवा पुरस्कार, नांदेड के सांता, शान ए नांदेड, इन्स्पायर पर्सनालीटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, कृतज्ञता सेवेचा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार मिळालेले आहेत. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन २२ संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या आहेत.
वर्षभरातील ३६५ दिवस दररोज तीन उपक्रम राबवणाऱ्या दिलीप ठाकूर यांना मिळालेल्या पुरस्काराची संख्या ८७ झाल्यामुळे अनेकांनी अभिनंदन केले आहे.