नसावा श्वास पण, जगण्यात हवायस तू
नजरेइतकेच लख्ख, पापण्यात हवायस तू…2
एकटी जरी रातीस, मग्न आठवात हवायस तू
मला शब्दात गुंफेल, अश्या अक्षरात हवायस तू…2
मला माझ्यापर्यंत नेणार्या, वाटेत हवायस तू
ओथंबलेल्या भावनांच्या, लाटेत हवायस तू…2
नकोच माझेपण तरीही, सोबत हवायस तू
स्पर्शासवे आत रुजणार्या, स्पंदनात हवायस तू…2
रुसलेले हसू अन्, भिजलेल्या अश्रूत हवायस तू
वाचेनही मला मी पण, लिहिणारा हवायस तू…2
फुटणार्या पावलांच्या जखमा बांधायला…
मला नेहमीच वटवृक्षा सारखा हवायस तू…2
—–रूचिरा बेटकर