नांदेड (प्रतिनिधी)- शिक्षक -विद्यार्थी -पालक यांच्यात सुसंवाद घडून आपसातील अंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहली मध्ये महिला पालकांचाही समावेश करून या सहलीचे आयोजन करण्यात यावे याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी
दिनांक 4 फेब्रुवारी 2024 वार रविवार रोजी सॅटॅलाइट डिजिटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड,नांदेड. येथील मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांनी त्यांच्या शाळेची सहल वारंगा गार्डन येथे महिला पालकांसह घेऊन गेले आणि महिला पालकांचे विविध खेळ घेऊन त्या खेळात विजेत्यांना बक्षिसे ही देण्यात आली.
मुलांसह घेण्यात आलेली धावण्याची स्पर्धेत-सौ.सुरेखा रविराज ससाणे , लंगडी- सौ.अश्विनी आकाश भदरगे ,
गट तयार करणे- सौ. आश्लेषा दशरथ सोनकांबळे आणि तळ्यात मळ्यात या स्पर्धेत – सौ.प्रियंका सुनील काळे या महिला पालक प्रथम आल्या आहेत.
शालेय शिक्षण घेत असताना शालेय सहल हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो. पण यात काहीतरी नवीन्य यावे म्हणून या शाळेने महिला पालकांसह या सहलीचे आयोजन केले आहे. क्षेत्रभेट असो वा शालेय सहल यातून शिक्षक- विद्यार्थी पालक यांच्यात उत्तम अशी अंतरक्रिया घडून यावी म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य असे संगोपना संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. मा.नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल घेऊन जाण्यात आली. कु.सुनिता गायकवाड, सौ.सुचिता इंगोले आणि राधाबाई सोनसळे या शिक्षिकासह, कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य लाभले.