कंधार : प्रतिनिधी
शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान कंधार तालुका अध्यक्ष कदम यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार.
आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गट मागासवर्गीय विभाग कंधार तालुका अध्यक्ष पिंटुभाऊ कदम यांच्या वतीने कंधार शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये कंधार येथील शासकीय रुग्णालयात रूग्णांना फळे व जीवन आवश्यक वस्तू वितरीत करण्यात आले.
तत्पूर्वी कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गवळकर सर, रमेश कांबळे, सोनू कांबळे, भालेराव महादेव पवार अर्जुन जोंधळे, मधु कांबळे, विनोद कदम, देवानंद जोंधळे इत्यादींची उपस्थिती होती अशी माहिती आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शिवसेना शिंदे गट मागासवर्गीय विभाग तालुका अध्यक्ष पिंटुभाऊ कदम यांच्या कडून प्राप्त झाली आहे.