… आज promise Day आहे माहीत होतं पण आज International Marriage Day आहे हे माहीत नव्हतं..
माझ्या चितळे नावाच्या मित्रांनी फोन वर हे मला सांगितलं आणि आर्टीकल लिहावं वाटलं..
आज आमच्या गृपचा टेकडी प्लॅन होता.. टेकडीवरुन खाली घरी आले तर सचिनने गरमागरम पोहे केले होते.. डिश भरली आणि मित्राला दिली आणि सोबत मीही खाल्ले .. लिंबु पिळलेले गरमागरम पोहे खाताना माझ्याच भाग्याचा मला हेवा वाटला .. आणि तितक्यात आजच्या या दिवसाबद्दलही समजलं.. मॅरेज काय आहे ??,,
मॅ.. मॅड for eachother
रे.. रेकग्नाइज.. एकमेकांना ओळखा
ज.. जवान रहा .. म्हणजेच आदर करा .. प्रेम करा..आनंदी रहा..
गुलाब नाही दिला तरीही चालेल पण कधीतरी असे पोहे हातात आले तर नक्कीच आवडेल..
टेडी नाही दिला म्हणुन काय झालं , माझ्या मित्रालाही पोहे मिळाले .. सोबत त्यालाही आदर मिळाला..
चॉकलेट तर अजिबात नको पण हळूच तो म्हणतो ,, सोनल तु वेस्टर्न मधेच छान दिसतेस.. तसेच कपडे घाल..
हग डे आणि किस डे हवाच ना मित्रांनो.. तो रोजच हवा कारण त्यांने नातं मजबूत रहातं.. आणि valentine डे ला दोघांनी एकत्र वेळ घालवावा.. त्यांच्या आवडीच्या गोष्टीत एकत्र रममाण व्हावं.. हे सगळे दिवस आहेत कारण Marriage Day रोजच आहे..
आमच्या घरात संशय घेण्याची रित नाही..
आमच्या खानदानात घटस्फोटाची परंपरा नाही..
आमच्या नात्यात भांडणाला जागा नाही..
आमच्या नात्यात आहे फक्त आणि फक्त प्रेम , आदर, काळजी आणि असलेल्या परिस्थितीत आनंदी रहाणं..
लोकांना वाटत असलेली लक्झरी आम्ही आमच्या सुखी संसारात शोधतो..
आमच्या घरात येणारे अनेक मित्र यात आम्ही आनंद मानतो..
दिवसभर घरभर फिरणाऱ्या माउ त्यांच्यात आम्ही देव शोधतो..
माझा एखादा मित्र दुपारी फोन करतो आणि म्हणतो , सोनल जेवायला काय करतेस ??. तेव्हा तुझ्याच आवडीची भाजी करतेय असं म्हणुन त्याला imotionally blackmail करुन जेवायला घालताना आम्ही धन्यता मानतो..
चला रे टेकडीवर म्हणत दोन चार टाळकी गोळा करुन व्यायाम करण्यात आणि इतरांना व्यायाम करायला लावण्यात आणि त्यानंतर bf करु म्हणत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहाण्यात परमोच सुख शोधतो..
आपण कोणीच कोणाला काहीही देत नाही मग आनंद तर वाटुच शकतो.. आमचा संसार पाहून अनेक जण म्हणतात ,आम्हाला तुमच्यासारखं जगायचय हीच आमची जीत आहे.. कुठलीही लक्झरी नाही.. कुठलाही दिखावा नाही.. कुठलाही बडेजाव नाही .. असेल तर फक्त आनंद आणि प्रेम..
आज नवरा बायको एकमेकांना प्रॉमीस काहीही देउ नका पण न देता आपल्याला जबाबदाऱ्या ओळखा आणि त्या पाळा..
भौतिक आणि कृत्रिम गोष्टीपेक्षा रीअल मधे जगा ..जसं आम्ही जगतो..
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले..