कंधार /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरमीडिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षेत कंधार शहरातील मनोविकास विद्यालयातील ९ वी वर्गातील अंशरा शाफीन मोहम्मद अन्सारोद्दीन प्रथम क्रमांक पटकवला या यशा बद्दल शाळेच्या वतीने व श्री शिवाजी माध्यमिक विदयालयात सत्कार करण्यात आला.
. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरमीडिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा २०२३/२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून २४ परीक्षार्थी परीक्षेस बसले होते. त्या अंशरा शाफीन मोहम्मद अन्सारोद्दीन हिने अ ग्रेड घेऊन विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकवला तसेच दोन विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. अंशरा शाफीन हिच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड पुलकुंडवार, संस्थेचे इतर पदाधिकाऱ्यांनी. अंशरा शाफीन हिला प्रशिस्ती पत्र देऊन सत्कार केला. या वेळी मुख्याध्यापीका सरिता पतंगे, ड्रॉइंग शिक्षक बंडेवार यांच्यास शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे ५ जानेवारी रोजी तालुक्यात अंशरा शाफीन प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल सत्कार करून बक्षीस दिले. या वेळी मुख्याध्यापक आंबटवार, उप मुख्याध्यापक अनिल जाधव, पर्यवेक्षक रमाकांत बडे, श्री भोसले, मिर्झा अजहर बेग, सरिता धोंडगे, कालिंदे पाटील, दत्तात्रय येमेकर, मिर्झा हिदायत बेग, प्रा.अफसर खान, प्रा. मिर्झा जमील बेग, शेख मोईनोद्दीन यांच्यासाह आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.