श्रम विकासाचा पाया – विचारपीठ

 

 

प्रत्येक व्यक्तीने दररोज काही ना काही श्रम करावेत. श्रम हाच आपला दाता, तीच आपली माता आहे.आणि करता, करविता तोच आहे, त्यासाठी श्रम करणे महत्त्वाचे आहे. जिथे काम केले जाते तेथे प्रत्यक्ष भगवान येत असतो. *जिथे राबती हात तेथे हरी* प्रत्येक यशस्वी व्यक्ती, राष्ट्र किंवा समाज कधी पुढे जातो तर तो केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमातून पुढे जातो. म्हणून श्रम हा विकासाचा पाया आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीत श्रमाला फार महत्त्व होते श्रम करूनच विद्यार्थी शिकत होते. त्यामध्ये त्यांना कसलाही कमीपणा वाटत नव्हता.

 

श्रम करण्याची कधीही कोणाला लाज वाटू नये. बदलत्या काळात भौतिक साधनांची उपलब्ध झाली. लोकांना काम कमी लागू लागले.
त्यामुळे आळस वाढले, आजच्या मुलांना थोडे जरी काम सांगितले तर बऱ्याच जणांना दम लागतो, कंटाळा येतो, त्यातून अनेक जणांना आजार जडले, समाजात दोन वर्ग निर्माण झाले, एक कामगारांचा आणि दुसरा भांडवलदारांचा त्यामुळे भेदाभेद निर्माण झाला, कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या संस्थेत *कमवा आणि शिका* पद्धतीने श्रम करायला सांगितले. नेहमी श्रम करा. श्रम प्रतिष्ठेवरच समाजाचा विकास अवलंबून असतो.समाजामध्ये एकात्मता वाढायचे असेल तर एकत्रित येऊन श्रम करावेत.वेगवेगळ्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांना श्रम करण्यास शिकवतात.

 

त्यामुळे श्रमाचे महत्त्व कळते. महात्मा गांधींनी चरख्यावर सूत कताई करत होते. कारण त्यातून त्यांचे श्रम समाजाला कळाले. बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांची सेवा करून आपले श्रम दाखवून दिले. तसेच मदर तेरेसा यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली.म्हणून श्रमाचे महत्त्व कमी होता कामा नये. श्रमप्रतिष्ठा हे एक नैतिक मूल्य आहे.

ते आपल्यावर श्रमावर अवलंबून आहे. म्हणून श्रमदान करत चला,
श्रम करणाऱ्या माणसाला कुठेही मानसन्मान असतो. लोकशिक्षक गाडगे महाराज अगोदर श्रम करायचे आणि नंतर ते गावातील लोकांनी दिलेलं अन्न आपल्या गाडग्यात घेऊन खात असत,काम न करता त्यांनी कधीच काही खाल्लं नाही, स्वतःच्या मुलीला सुद्धा त्यांनी त्यांच्या आश्रमात काम केल्याशिवाय भोजन करू नये असे सांगितले. म्हणून श्रम फार महत्त्वाचे आहेत, श्रम न करता *दे रे हरी पलंगावरी* असे म्हटले तर काही मिळत नाही, दैववादी होण्यापेक्षा कार्य करून श्रम करून कर्तुत्वान बना, *कोशिश करीत रहा कोशिशी मधून तुम्हाला सर्व काही साध्य होते,

म्हणून *कोशिश करने वालों की हार नही होती* असे म्हटले जाते .सारखे श्रम करा; मोठे व्हा, तुम्हाला कधीही, कुठेही ,सन्मानच मिळेल, परंतु आळशी माणसाला काही मिळणार नाही, सारखे चालत राहा, संकल्प करा, अभ्यास करा, तरुणांने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावेत, एक ,दोन वेळेस अपयश आले तरी तिसऱ्या वेळेस आपण विजयी होणार म्हणजे होणारच, असे मनाशी खूणगाठ बांधावी आणि आतापर्यंत झालेले थोर व्यक्ती त्यांच्या श्रमामधूनच मोठे झाले आहेत,जर श्रम करत नसाल तर पाठीमागे राहाल ,अनेक खेळाडूंनी शतके बनवले कारण त्यांची त्यात श्रम आहेत,अनेक साहित्यिकांनी ग्रंथ,लेख पुस्तके लिहिले त्यांना पुरस्कार मिळाले ते श्रम केल्यामुळेच; कोणालाही काहीच न करता आज पर्यंत कधीच मोठे होता आले नाही, म्हणून *प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता तेलही गळे* असे आपण ऐकतो. म्हणून तुम्ही श्रम करा.शेतकरी राब राब राबतो, दिवस रात्र कष्ट करतो,

 

म्हणून आज आपण गुण्यागोविंदांने एकत्रित वागत आहोत, मला तरुणांना ,युवकांना एवढंच सांगायचं आहे की? त्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर *उठा जागे व्हा* आणि यशस्वी व्हा, जो माणूस थोडा थोडा चालत जातो तो अंतर कापतो, जो माणूस जागचा हालत नाही, त्याला कुठेही जाता येत नाही,व यश ही मिळत नाही,समाजातील काही माणसांनी मोठमोठे पर्वत पार केले, तरीही ते थकले नाहीत
काही व्यक्तींनी आपले जीवनच सेवेसाठी आहे म्हणून समाजाला सेवा दिल्या. सेवा करा आपोआपच मेवा मिळतो असे म्हणतात.काही वार्ताहार अगोदर छोट्या छोट्या बातम्या तयार केले. नंतर ते पत्रकार झाले. नंतर उपसंपादक आणि नंतर श्रमाच्या जोरावर जिद्दीवर संपादक होऊन स्वतंत्र वर्तमानपत्र काढून समाजाची सेवा केली.

 

अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय दिला. त्यांच्या मनातली अभिव्यक्ती बाहेर आली आणि ते सुखी झाले; असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, खरंच सर्वसामान्य माणसे मोठी का होतात? कारण ते कष्टाने पुढे गेलेले असतात. आणि दुसऱ्यांसाठी ते प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पुढे येतात. डॉ. ए,पी,जे अब्दुल कलाम हे साध्या व गरीब घरातून मोठे झाले, आणि आज भारतरत्न म्हणून त्यांचा गौरव केला जातो, अशा व्यक्तींचे पुन्हा पुन्हा नाव का घ्यावे वाटतात ,तर ते तेवढे मोठे श्रम केल्यामुळे झालेत हे विसरून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढाया केल्या ,शत्रूला पराभूत केले या हिंदवी स्वराज्यासाठी आपले आयुष्य झिजविले, ते सर्व श्रमामधूनच साध्य झाले, म्हणून श्रम हा विकासाचा पाया आहे जर तुम्ही काहीच केले नाही तर तुम्हाला दारिद्र्य येईल, नंदनवनाचे नरक होईल. अपयश आल्यानंतर तुम्ही दैवावर नशिबावर अवलंबून राहाल
.तर तुम्हाला काहीच मिळणार नाही,

 

म्हणून तुम्ही थोर व्यक्तीची चरित्रे वाचा, तुमच्या कामातून तुमचं नाव पुढे येते असे कार्य करा, कारण कार्य करणारा माणूस आज पर्यंत पाठीमागे राहिला नाही, *जो दैवावरील विसंबला। त्याचा कार्यभाग संपला।।* हे खरोखर आहे
,जनसामान्य लोक राबराब राबवून कष्ट करून ते पुढे जातात. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपले आयुष्य सर्व समाजातील मुलांना शिकवण्यासाठी घालविले. त्यांचे त्या पाठीमागे श्रम आहेत .
मला काय त्याचे ?असे म्हणून बसले असते तर ? काहीही झाले नसते म्हणून मला प्रत्येकाला सांगावे वाटते आपले विचार प्रगल्भ व मोठे असावेत. आपल्या विचारांवर इतरांनी विचार करावा असे ते असावेत. खोटे बोलू नका .त्यातून थोडा तुम्हाला लाभ होईल; परंतु नंतर कायमची हानी होते. म्हणून श्रम करा. विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर ते उत्तीर्ण होणार. गैरमार्गाचा अवलंब केला. जरी उत्तीर्ण झाले तरी ते आत्मविश्वासाने जीवन जगू शकत नाहीत .कारण ते बावरलेले, भेदरलेले दिसतात .म्हणून विद्यार्थ्यांनी ज्ञानाकडे गंभीरपणे बघून सचोटीने ज्ञान प्राप्त करावे.
ज्ञानाचा दर्जा त्यामुळे उंचावेल, त्यासाठी श्रम करा. दादाभाई नौरोजी नेहमी म्हणायचे *अखंड चळवळ करा, चळवळ करा* यश आपल्या जवळ आहे .आपल्याला स्वातंत्र्य मिळेल म्हणून कार्य करा,बऱ्याच ठिकाणी आश्रमामध्ये भाविक, भक्त गेल्यानंतर थोडं श्रम करण्यासाठी सांगतात ,आणि नंतरच मग त्यांना पुढील गोष्टी विचारतात, म्हणून कुठेही श्रमाला महत्त्व आहे. त्यासाठी लहानपणा पासूनच तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी कार्य करीत रहा .
त्यामुळे तुमचा विकास तुमच्या चरणाजवळ आहे .
असे मला सांगावे वाटते, सैनिकांनी अहोरात्र उभे राहून सीमेवर आपली सेवा करतात, तसेच शिक्षक दिवस-रात्र विद्यार्थ्यांना घडवतात. समाजामधील समाजसुधारक, क्रांतिकारक,लेखक ,वकील,डाॅक्टर समाजामध्ये एकात्मता नांदावी म्हणून वेगवेगळे श्रम करून करून लोकांना एकत्रित आणून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. समाज जीवंत ठेवतात.
म्हणून आजच्या तरुणांनी मोबाईल मध्ये आपला अमूल्य वेळ न घालवू नये. चुकीच्या लोकांच्या सोबत न फिरता छोटा-मोठा व्यवसाय करावा, मनाशी लाजू नयेत, कर्म करीत रहा फळ तुम्हाला आपोआप मिळेल.

आणि जीवनाचं सार्थक करावं ही अपेक्षा.त्यासाठी श्रम हा विकासाचा पाया आहे हे त्रिकाल सत्य आहे

 

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरका वाडी ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *