*नांदेड येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै.नाना पालकर प्राथमिक विद्यालय नांदेड येथे
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात थंडगार पाण्याचा लाभ मिळावा यासाठी वॉटर कुलर भेट दिला.त्या वेळी बोलताना ठाकूर असे म्हणाले की, ही शाळा शिक्षण क्षेत्रातील भारतीयत्व जपण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे संस्कार केंद्र असल्यामुळेच या शाळेची निवड करण्यात आली आहे.*
भाजपा,लायन्स क्लब व अमरनाथ यात्री संघ यांच्यातर्फे
आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पूजन झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर या प्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीया, प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डाॅ. दि. भा. जोशी,लायन्स क्लब नांदेड सेन्ट्रल चे सचिव शिवाजीराव पाटील, लायन्स कोषाध्यक्ष सुनील साबू, सहसचिव गौरव दंडवते ,कै. नाना पालकर प्रा. शाळा नांदेडच्या शालेय समितीचे सदस्य अनिल डोईफोडे, संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री रमेश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे स्वागत सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वाॅटर कूलरचे पूजन करून व विद्यार्थ्यांना थंड पाणी वाटप करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दिलीप ठाकूर यांनी हे वाॅटर कूलर देणगी म्हणून देण्यासाठी कै. नाना पालकर शाळाच का निवडली हे विषद करताना या शाळेतून प्रखर देशभक्त व देशहिताचा, विवेकवादी विचार करणारी पिढी घडविली जात आहे असे गौरवोद्गार काढले.अरविंद भारतीया यांनी शाळेस सदैव सहकार्य करू असे सांगत वस्तू रूपातील देणग्यांची घोषणा केली.यावेळी गौरव दंडवते यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करा असा संदेश दिला. डॉ. जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात दिलीप ठाकूर हे वर्षभर राबवित असलेल्या विविध ८५ उपक्रमांचे कौतुक केले. मुख्याध्यापक रमेश सातपुते यांनी शाळेस दिलेल्या देणगीबद्दल ॲड. ठाकूर, लायन्स क्लब, भाजपा व अमरनाथ यात्री संघाचे सर्व सदस्य व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ.कल्पना कांबळे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. दिलीप ठाकूर यांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल पालक वर्गानी समाधान व्यक्त केले.