कंधार : प्रतिनिधी
कंधार शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनास हजरत शेख अली सांगडे सुलतान मुश्कीले आसान रहे.( छोटी दर्गा चे) नाव देण्यात यावी असे दि. 15 फेब्रुवारी रोजी एमआयएम या सामाजीक संघटनेच्या वतीने तहसिलदार कंधार यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे.
कंधार शहर हे साधु संताचे ऐतिहासीक शहर आहे. कंधार शहरी सादर व शेख अली सांगडे सुलतान मुश्कीले आसान रहे. यांना ५८९ वर्षाचा इतिहास आहे. सदर संतावर सर्व जाती धर्माची आस्था आहे. हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतीक आहे.
कंधार शहरात नगर परिषद कंधार च्या वतीने नव्याने उभारण्यात आलेले व्यापारी संकुलनास हजरत शेख अली सांगडे सुलतान मुश्कीले आसान रहे. संताचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी
शेख महेमुद (हब्बु) शेख याखुब तालुका विधानसभा अध्यक्ष कंधार / लोहा एमआयएम,खमर अली,अर्शद अली, शेखहबीब भाई, शेख वहीद भाई, मगदुम हाजीसाब, शेख युसूफ, शेख मकसुद, इब्रान पठाण, शेख लुखमन,शेख जुनेद आदी सह एमआयएम चे सदस्य उपस्थित होते.