मुंबई दि (प्रतिनिधी)
मुंबई धारावी परिसरातील तरुण तडफदार युवा नेतृत्व श्री राजेश पिल्लाई यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हि निवड राष्ट्रीय अध्यक्ष अनित कौशिक यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.
वडिलांच्या अनुस्तिथीत राजेश पिल्लाई यांनी अनेक हालअपेष्ठा सोसून आपल्या जीवनाची कारकीर्द स्व:बळावर उभारली आहे. इंग्रजी शाळेत सेवकांची नोकरीं करत आई स्टेला हिने आपल्या मुलाचा योग्यरित्या सांभाळ केला. त्याच्यावर चांगल्या संस्काराचे धडे गिरविले.
आशिआ खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन गजबजलेल्या वस्तीत असंख्य अडचनींना तोंड देत असताना राजेश पिल्लाई याने समाजसेवेचे वृत्त स्वीकारले. गोर गरिबांना होत असलेल्या अडचणींना मात देण्यासाठी नंदिनी मल्टीकेअर सर्व्हिसेस च्या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या हाताला कामे दिली.
सम्यक मैत्रेय फौंडेशन व स्पार्टन फाउंडेशन च्या अख्त्यारीत निवारा नसलेल्या लोकांना शासनाचा पाठपुरावा करून शेकडो घरात संसार थाटले. आरोग्य शिबीरे घेऊन अनेकांचे प्राण वाचवले शिवाय अल्पदरात रक्त आणि नेत्र तपासणी तसेच एक्स-रे सुविधा उपलब्ध करुंनं दिली.
देशातील आयुर्वेद जनसामाण्या पर्यंत पोहोचून आलोपॅथी पासून भारतीय समाज दूर व्हाबा व भारतीय जीवन पद्धती सर्वाभिमुख व्हावी या हेतूने
पतंजली चा व्यवसाय करून आयुर्वेदा मुंबई महानगरात प्रचार व प्रसार केला.
राष्ट्रीय स्वयं सेवक संघात सहभागी होऊन समाज व हिताचे धडे घेऊन भारत सरकारला मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांच्या सर्व कल्यानकारी योजना लोकांभिमुख होण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांची पावती म्हणुन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनित कौशिक यांनी राजेश पिल्लाई यांना महाराष्ट्र राज्याची जवाबदारी दिली आहे.
पिल्लाई यांच्या निवडिमुळे राज्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना सर्व महाराष्ट्रातील छोट्या गाव तांड्यात हे अभियान पोहोचवून समाज व देश सेवा करणार असल्याचे मत राजेश पिल्लाई यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले.